आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान 2016 मध्ये पाकिस्तानला जाणार, शरीफ यांचे निमंत्रण मोदींनी स्विकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- रशियातील उफा शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात शुक्रवारी बंद द्वार बैठक झाली. सकाळी 9.30 (भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10 वजाता) सुरू झालेली बैठक तब्बल दीड तास चालली.

नरेंद्र मोदी हे 2016 मध्ये पाकिस्तानला जाणार आहेत. पाकिस्तानात होणाऱ्या सार्क संमेलनात मोदी सहभागी होणार आहेत. रशियात झालेल्या भेटीत शरीफ यांनी मोदींना निमंत्रण दिले. मोदींनीही हे निमंत्रण स्विकारले आहे. मुंबई हल्ल्यासंदर्भात आपण सहकार्य करु असे आश्वासनही नवाज शरीफ यांनी दिले आहे.
मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यासदंर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी-उर-रहमान लख्वीच्या सुटकेच्या मुद्दयावर चर्चा करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी नरेंद्र मोदी यांनी केली. हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने मिळणार असल्याचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोदी-शरीफ भेटीत या मुद्द्यावर झाली चर्चा...
भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, उभय देशांच्या दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्‍यात आली.
- नवाज शरीफ यांनी मोदींना दिले निमंत्रण. 2016 मध्ये पाकिस्तानात होणार्‍या सार्क संमेलनात सहभागी होण्यासाठी मोदी पाकिस्तानात जाणार
-मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यासदंर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी-उर-रहमान लख्वीच्या सुटकेच्या मुद्दयावर चर्चा करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी नरेंद्र मोदी यांनी केली.
- दोन्ही देशांचे नॅशनल सेक्टुरिटी अॅडव्हायझर लवकरच दिल्ली बैठक घेतील. यावर पर्यटनाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल.
- भारत आणि पाकिस्तान पुढील 15 दिवसांत आपापल्या तुरुंगात कैद असलेल्या मच्छीमारांची सुटका करतील. सीमेवर त्यांना अटक करण्यात आले होते.
- भारतीय बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्सचे डीजी लवकरच बैठक करतील.
- दोन्ही देशाचे मिलिट्री ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल देखील बैठक घेतील.
- भारत-पाकिस्तान धार्मिक पर्यटनाला प्रोत्सहन दिले जाईल.

दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी देखील या द्वीपक्षीय चर्चेत सहभाग घेतला होता. भारताकडून एनएसए अजीत डोभाळ, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यावेळी उपस्थित होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पाकच्या कुरापती सुरुच, गोळीबारात भारतीय जवान शहीद