आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Arrives In Washington To Attend Nuclear Security Summit

मोदी म्हणाले, \'तो त्याचा दहशतवादी, हा माझा दहशतवादी नाही\', ही वृत्ती बदला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- दहशतवादाचे जाळे जगभर पसरले आहे. दहशतवादी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. दहशतवाद ही आता एखाद्या देशाची समस्या राहिलेली नाही. 'तो त्याचा दहशतवादी, हा माझा दहशतवादी नाही', ही वृत्ती मुळात बदललायला हवी, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी अमेरिकेत केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये गुरुवारी रात्री दिलेल्या डिनर कार्यक्रमात मोदींनी संबोधित केले.

मोदी म्हणाले, दहशतवाद मोडून काढण्यासाठी जभरातील देशांनी एकत्र येण्‍याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन दहतवादाला आव्हान द्यायला हवे. देश पातळीवरच कृती न करता जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. सर्व देशांना परस्परातील सहाकार्य वाढवण्याचे आवाहन केले. यादरम्यान, पाकिस्तानाचा नामोल्लेख न करता या कार्यक्रमात मोदींनी निशाणा साधला. यावेळी अनेक देशांचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, मोदी ब्रुसेल्सहून गुरुवारी अमेरिकेत दाखल झाले. चौथ्या अण्वस्त्र सुरक्षेसंबंधी दोनदिवसीय परिषदेत ते सहभागी होतील. त्यानिमित्ताने मोदी विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांशी आण्विक धोक्याबद्दल चर्चा करतील. परिषदेत 53 हून अधिक देशांचे नेतेही आपले म्हणणे मांडणार आहेत.

मोदींचा अमेरिकेचा हा तिसरा दौरा आहे. मोदी आणि आेबामा यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार किंवा नाही, याबद्दलही अनिश्चितता आहे. परंतु रात्रभोजनात दोन्ही नेते एकत्र येतील. परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी व्हाइट हाऊसवर भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मोदी-आेबामा यांच्यात दोनदिवसीय परिषदेच्या निमित्ताने अनेकदा भेटी आणि संवाद घडून येईल, असे अधिकाऱ्यांना वाटते. 2014 मध्ये मोदी आेबामा यांच्यात चर्चा झाली होती. माेदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा...
> मोदींनी सांगितले दहशतवादाची तीन कारणे...

> वॉशिंग्टनमध्ये दोन दिवसांचा मुक्काम
>
मोदी म्हणाले, तर संस्थांचे अस्तित्व बिनकामाचे ठरेल