आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आशियातील एकच देश पसरवतोय दहशतवाद; मोदींंचा पाकवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हांगझोऊ- पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी जी-२० शिखर परिषदेत पाकिस्तानवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. ‘दक्षिण आशियातील एकच देश आमच्या विभागातील देशांत दहशतवाद पसरवत आहे,’ असा आरोप मोदींनी केला. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना एकाकी पाडून त्यांना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

जी-२० शीख परिषदेच्या समारोपाच्या सत्रात हस्तक्षेप करताना मोदी म्हणाले की, दक्षिण आशियातील एकच देश आमच्या विभागातील देशांमध्ये दहशतवादाचा प्रसार करत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या संकटाच्या विरोधात एकमुखाने आवाज उठवावा आणि एकत्रित कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे. दहशतवादाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणाऱ्यांना एकाकी पाडून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

दहशतवादाला आर्थिक मदत करणाऱ्यांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याच्या जी-२० परिषदेच्या निर्धाराबद्दल सर्व देशांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले की, हिंसाचार आणि दहशतवाद हे एक मोठे आव्हान जगासमोर आहे. काही देशच अशा शक्तींना पाठिंबा देत आहेत. भारताने नेहमीच दहशतवादाच्या विरोधात कठोर धोरण अवलंबले आहे. मोदींनी रविवारीही ब्रिक्स देशांना दहशतवादाच्या विरोधात एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले होते.

काळापैसा, करचुकवेगिरीच्या विरोधात लढण्याची गरज: आर्थिकगुन्हेगारांना आश्रय देता त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, मनी लाँडरिंग करणाऱ्यांचे विनाअट प्रत्यार्पण करावे आणि बँकांच्या कामकाजाबाबतची गोपनीयता संपवावी, असे आवाहनही मोदी यांनी जी-२० च्या नेत्यांना केले. मोदी म्हणाले की, प्रभावशाली आर्थिक सुशासनासाठी भ्रष्टाचार, काळा पैसा आणि करचुकवेगिरीच्या विरोधात लढण्याची गरज आहे. हे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर आर्थिक गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

आर्थिक सुधारणांना ब्रिटनचा पाठिंबा
मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचीही भेट घेतली. ब्रिटनने अलीकडेच युरोपियन समुदायातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. या निर्णयानंतर दोन्ही देशांना कोणत्या संधी आहेत यावर उभय नेत्यांत चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रातील भागीदारीबद्दल त्यांच्यात चर्चा झाली. ब्रिटन अजूनही भारताचा महत्त्वाचा भागीदार असल्याचा उल्लेख मोदींनी केला. थेरेसा मे यांनीही मोदींच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला पाठिंबा दिला तसेच मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी आणि स्किल इंडिया या कार्यक्रमांत भागीदारीचे आश्वासन दिले.

जागतिक नेत्यांशी चर्चा
पंतप्रधानमोदी यांनी जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय तसेच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांच्या भेटीत भारताच्या एनएसजी प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला. मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष अोलांद यांच्या भेटीत स्कॉर्पियन पाणबुडीशी संबंधित संवेदनशील माहिती लीक झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...