आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी आयर्लंड, अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना, राहुलच्या अमेरिकी दौऱ्यावरुन संशयाचे वादळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवार) पहाटे आयर्लंड आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेही अमेरिकेच्या दौऱ्यावर काल रवाना झाले. येथील जागतिक परिषदेला ते संबोधित करणार आहेत. परंतु, त्यांच्या दौऱ्यामागे काही वेगळे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
यासंदर्भात ट्विटरवर माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले, की आता पश्चिमेकडे जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन देश, तीन शहरांच्या दौऱ्यावर रवाना. आयर्लंड आणि अमेरिकेला भेट देणार. संयुक्त राष्ट्रसंघालाही संबोधित करणार
नरेंद्र मोदी आज आयर्लंडला थांबणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान इंडा केनी यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहेत. आजच सायंकाळी मोदी अमेरिकेसाठी रवाना होतील. अमेरिकेत ते 29 सप्टेंबरपर्यंत थांबणार आहेत.
24 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचतील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 70 व्या आमसभेला ते संबोधित करतील. याच दिवशी अमेरिकी कंपन्यांच्या सीईओंना भेटतील. त्यानंतर 26 आणि 27 सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅतीला भेट देतील. येथील भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतील. 28 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना भेटतील.
आयर्लंडमधील मोदींचा शेड्यूल
- भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता डबलिनला जातील.
- मोदी डबलिनमध्ये 5-6 तास राहतील.
- सायंकाळी 7.30 वाजता भारतीय वंशाच्या लोकांना भेटतील.
विकास खन्ना तयार करतील मोदींसाठी भारतीय व्यंजने
गेल्या वेळी नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा नवरात्रौत्सव सुरु होता. यावेळी त्यांनी भोजन केले नव्हते. केवळ पाणी प्यायले होते. परंतु, आता नरेंद्र मोदींसाठी शाही मेजवानी आयोजित केली जाणार आहे. विशेष म्हणजे मोदी व्हेजिटेरिअन असल्याने त्यांनी प्रसिद्ध भारतीय शेफ विकास खन्ना यांना सोबत घेतले आहे. खन्ना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या व्हेजिटेरिअन डिश तयार करतील.
दरम्यान, राहुल गांधी काल अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. याबाबत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले, की जागतिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी अमेरिकेच्या अॅस्पिनला गेले आहेत. याला वेगवेगळ्या देशांमधील खासगी आणि सरकारी क्षेत्रातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्याने चर्चेला उधाण...नरेंद्र मोदी यांचे फोटो... विकास स्वरुप यांनी केलेली ट्विट....