आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US स्टेट व्हिजिटवर मोदी, 7 वर्षांपूर्वी मनमोहनसिंग होते ओबामांचे खास गेस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पाच देशांच्या दौर्‍यादरम्यन अमेरिकेत पोहोचले आहेत. यूएस स्टेट व्हिजिटसाठी मोदी दोन दिवस अमेरिकेत थांबणार आहेत. मोदींचा हा चौथा अमेरिका दौरा आहे. यापूर्वी मोदींनी सप्टेंबर 2014, सप्टेंबर 2015 व मार्च 2016 मध्ये अमेरिकेचा दौरा केला होता.

नरेंद्र मोदी पहिल्यांदा अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटसाठी आले आहेत. 7 वर्षींपूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग स्टेट व्हिजिटसाठी अमेरिकेत आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ते खास गेस्ट बनले होते.

डेव्हिड कॅमरन, फांस्वा ओलांद व शी जिंगपिंगच्या यांच्या रांगेत मोदी...
- या स्टेट व्हिजिटसह नरेंद्र मोदी यांनी डेव्हिड कॅमेरन, फांस्वा ओलांद व शी जिंगपिंगसारख्या नेत्यांच्या श्रेणीत येण्याचा मान मिळवला आहे.
- चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांनी सप्टेंबर 2015 मध्ये यूएस स्टेट व्हिजिटवर आले होते.
- फेब्रुवारी 2014 मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद देखील यूएस स्टेट व्हिजिटवर आले होते.
- याशिवाय डेव्हिड कॅमरन, शिंजो आबे, हू जिंताओ सारखे नेते स्टेट व्हिजिटवर यूएसमध्ये आले होते.

मनमोहन सिंग होते बराक ओबामांचे पहिले गेस्ट
- बराक ओबामा यांनी 2009 मध्ये अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. जानेवारी 2017 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.
- ओबामा राष्‍ट्राध्यक्ष बनल्यानंतर यूएसच्या स्टेट व्हिजिटवर जाण्याचा पहिला मान भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मिळाला होता.
- मनमोहन सिंग नोव्हेंबर 2009 मध्ये यूएस स्टेट व्हिजिटवर गेले होते.

काय आहे मोदींचा यूएस दौरा...
- 7 जूनला व्हाइट हाऊसमध्ये बराक ओबामांची भेट
- आधी डेलिगेशन लेव्हरवर नंतर वन-टू-वन होईल भेट
- उभय नेते घेतील संयुक्त प्रेस कॉन्फरन्स
- प्रेस कॉन्फ्रन्सनंतर मोदी यूएस लीडर्सचे गेस्ट होतील.
- अर्लिंग्टन नॅशनल सिमेट्रीवर जाऊन अनोन सोल्जर्सला श्रद्धांजली अर्पण करतील.
- स्पेस शटल कोलंबिया मेमोरियलला भेट देतील. येथे भारतीय वंशाची कल्पना चावला हिला श्रद्धांजली देतील.
- सायंकाळी अमेरिकेतील टॉप कॉर्पोरेट लीडर्सची भेट घेतील.
- यावेळी अमेजनचे सीईओ जेफ बेजोस उपस्थित राहातील.
- एफडीआयवर मोदींचा फोकस
- 40th यूएस इंडिया बिझनेस काउंसिलला मोदी संबोधित करतील.
- एका सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थिती देतील.

पुढील स्लाइडवर इन्फोग्राफिक्समधून पाहा, काय असेल मोदींच्या यूएस स्टेट व्हिजिटमध्ये...
बातम्या आणखी आहेत...