आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Interacting With Some Of The Fortune 500 CEOs In New York.

मोदींना भेटले फॉर्च्युन-५०० चे टॉप ४२ सीईओ, म्हणाले-भारत बदलतोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- फॉर्च्युन-५०० मध्ये सहभागी असलेल्या आघाडीच्या ४२ अमेरिकी कंपन्यांच्या सीईओने मोदी सरकारच्या मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांचे समर्थन केले. गत वर्षात अनेक सुधारणा घडून आल्या, परंतु अजूनही बरेच काही होणे बाकी आहे, असे अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले.
दुसरीकडे माध्यम सम्राट रूपर्ट मर्डोक यांनी अतिशय गुंतागुंत असलेल्या देशाचे सक्षम नेते असे कौतुकोद्गार काढले. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वोत्तम नेते आहेत, परंतु त्यांना सर्वाधिक जटिल देशात विविध ध्येयांना गाठण्याचे कठीण कार्य करायचे आहे. त्या अगोदर मोदी यांनी अमेरिकेच्या आठ मोठ्या वित्त कंपन्यांचे सीईओ आणि बँकर्ससोबत चर्चा केली. मर्डोक यांच्यानंतर बिझनेस टायकून मायकल ब्लूमबर्ग यांनी देखील मोदी यांचे कौतुक केले. ते ट्विटमध्ये म्हणतात, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भारत आणि जगात परिवर्तन आणणारे ठरले आहे.

तिरंग्याचा वाद प्रसिद्ध शेफ विकास खन्नाला मोदींनी तिरंग्यावर ऑटोग्राफ दिल्यावरून वादंग निर्माण झाले आहे. मोदींची स्वाक्षरी असलेला हा ध्वज विकास ओबामांना देणार होते. वाद वाढल्यानंतर हा ध्वज सरकारने मागे घेतल्याचे वृत्त आले आहे. मोदींनी डीनरनंतर भेट म्हणून हा तिरंगा दिला होता, असे विकास यांनी म्हटले आहे.
हे सीईओ होते हजर
न्यूज कॉर्प - रुपर्ट मर्डोक
२१ फॉक्स - जेम्स मर्डोक
न्यूज कॉर्प - रॉबर्ट थॉम्सन
स्टार इंडिया - उदय शंकर
डिस्कव्हरी - डेव्हिड जॅसलॅव
सोनी एन्ट - एम. लिंटन
इंटरपब्लिक - मायकल रोथ
व्हाइस मीडिया - शेन स्मिथ
डब्ल्यूपीपी - मार्टिन सोरेल
टाइम वॉर्नर - जेफ ब्युक्स
एएंडइ नेटवक्स - नॅँसी ड्युबक
व्हिसी इंडस्ट्रीज - अँटनी प्रॅट
रूट वन - विल्यम
व्हॅल्यू एक्ट - जेफ अब्बन

...आणि यांच्याही भेटी घेतील...
- सत्या नडेला, सीईओ, मायक्रोसॉफ्ट : नुकतेच मायक्रोसॉफ्ट विंडोज १० बाजारात आले असून भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नेटवर्क हा डिजिटल इंडियाचा कणा आहे. कंपनी याचा फायदा घेऊ इच्छित आहे.

- जॉन टी. चेम्बर्स, सिस्को टेक्नॉलॉजी : स्मार्ट सिटीसोबतच कनेक्टेड मोबिलिटी, बिग डाटा आणि इंटरनेटसाठी कार्यरत स्टार्टअप्समध्ये २५० कोटी रुपये गुंतवण्याची त्यांची इच्छा आहे.
- पॉल जेकब्ज, क्वालकॉम: ही एक चिपमेकर कंपनी आहे. भारत हळूहळू जगातील मोठी स्मार्टफोन बाजारपेठ बनत आहे. स्मार्ट सिटी, हेल्थकेअर, वेअरेबल्स इत्यादी व्यवसायवाढीसाठी स्मार्टफोन टेक्नॉलॉजी भारताला देण्याची त्यांची इच्छा आहे.
यांच्यावरही लक्ष...
स्मार्ट सिटी साठी वाहतूक व्यवस्था, हवापाणी गुणवत्ता, वाहतूक अडथळा तसेच सुरक्षेसंबंधी सेन्सर्स व्हॅलीत स्वस्त व सहज तयार होतात. ते बनवणाऱ्या कंपन्यांना मोदी आमंत्रण देऊ शकतात.

आरोग्य अॅप्स स्वस्त सेन्सर स्मार्टफोन आणि टॅबलेट्सला जोडून आरोग्यविषयक तंत्रज्ञान विकसित केले जाऊ शकते. अमेरिकेच्या रुग्णालयात हे यशस्वी ठरले आहे. मोदी ते भारतात वापरू इच्छित आहेत.

शिक्षण संबंधी हजारो अॅप्लिकेशन आहेत. भारतीय उद्योजक ते भारतीय भाषांत उपलब्ध करू शकतात. ज्यांना पारंपरिक पुस्तके वाचण्याची इच्छा नाही ते या अॅपच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने वाचू शकतात.

आणि...३ उद्देशही..
- सिलिकॉन व्हॅलीतील कल्पनाशक्ती, सृजनशीलता, विद्यापीठ प्रयोगशाळेतून बाजारापर्यंत उत्पादनसाखळी तयार करणे तसेच मार्केटिंग धोरणांची निश्चिती इत्यादी कामकाज पद्धती भारत कसा अवलंबू शकतो हा भारताचा उद्देश असेल.

- गुंतवणुकीला प्राधान्य देण्यासाठी मोठ्या आयटी कंपन्यांची मनधरणी करणे. यात अॅपल, गुगल प्रमुख आहेत.

- डिजिटल इंडियासाठी इंटरनेट सुविधेचा विस्तार, इलेक्ट्रॉनिक्सला चालना मिळेल.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे फेसबुकचे झुकेरबर्ग यांची इच्छा, अॅपल कंपनीचे टीम कुक यांची इच्छा, गुगलचे सुंदर पिचाई यांची इच्छा आणि यांच्या कडून पंतप्रधान मोदी यांची इच्छा...