हँग्झू- जी-२०च्या निमित्ताने पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी त्यांचे चिनी समकक्ष परिषदेचे यजमान शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर संबंधी चिंताही व्यक्त केली. कारण हा प्रकल्प पाक व्याप्त काश्मीरमधून जाताे.
पाकिस्तान-चीनमधील हा प्रकल्प सुमारे ४६ अब्ज डॉलर्सचा आहे. त्यात रेल्वे, रस्ते, तेल वाहिनी इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश आहे. या प्रकल्पाबाबत चीन पाकिस्तानने संवेदनशील असले पाहिजे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने रविवारी उभय नेत्यांमध्ये सुमारे ३५ मिनिटे ही बैठक चालली. कॉरिडोरमुळे पीआेकेमध्ये दहशतवाद वाढू लागला आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाई राजकारणापासून वेगळी असली पाहिजे. दोन्ही देशांनी महत्वाच्या प्रश्नावर सकारात्मक पद्धतीने उपाय शोधला पाहिजे. तीन महिन्यातील उभय नेत्यांची ही दुसरी बैठक आहे. या अगोदर जूनमध्ये ताश्कंदमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत त्यांची चर्चा झाली होती. एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारताला चीनकडून होणारा विरोध, आर्थिक क्षेत्रात निर्माण झालेले प्रश्न, जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अजहरवर निर्बंध, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चिनी व्हेटोमुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. बैठकीत जी-२० तील अजेंडा गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स संमेलनासंबंधी देखील चर्चा झाली. असे त्यांनी म्हटले आहे. भारतासोबतच्या कठीण संबंधांना अधिक सुकर करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. विविध क्षेत्रांतील सहकार्यातून हे शक्य आहे. परंतु दोन्ही देशांनी परस्परांचा आदर करायला हवा, अशी अपेक्षा शी यांनी व्यक्त केली.
जागतिक आर्थिक विकासासाठी एकजुटीची गरज : पंतप्रधान मोदी
जागतिक आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी संवादातील अडथळ्यांवर मात करून एकजुटीने सहकार्याने काम करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते जी-२० परिषदेत मार्गदर्शन करत होते.
खरे तर आज जगासमोर राजकीय आर्थिक पातळीवरील अनेक समस्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. सर्व देशांत संवाद हवा. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आता सर्वसंमतीने कृती आराखड्यावर काम करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी विषयपत्रिकेवर त्याला प्राधान्य देण्यात यायला हवे, परंतु त्या अगोदर आर्थिक व्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी. पायाभूत सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. सदस्य राष्ट्रांच्या समस्या संधी जवळपास सारख्याच आहेत. यंत्रे, डिजिटल क्रांती नवीन तंत्रज्ञान हेच नवीन पिढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जी-२० देशांनी भागीदारीचा विचार करून परस्परांतील सहकार्य वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यामुळेच बळकट भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले आहे. जी-२० च्या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. कारण ही संघटना जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के समुदायाचे प्रतिनिधित्व करते. त्यात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन, अमेरिका, युरोपियन युनियन हे सदस्य राष्ट्र आहेत. दहशतवादाची समस्या सोडवण्यावरही सर्व देशांमध्ये विचारविनियम होणार आहे.
आज थेरेसांना भेटणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा मोदी यांची रविवारी जी-२० च्या निमित्ताने आेझरती भेट झाली. परंतु चर्चा मात्र होऊ शकली नाही. सोमवारी मोदी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मॅक्री यांची भेट घेतील. त्यानंतर ते मायदेशी परततील.
प्राचीन साहित्याचे भाषांतर, पेंटिंग भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राचीन भारतीय साहित्याचे भाषांतर पेंटिंगची भेट देण्यात आली. पेकिंग विद्यापीठातील प्रोफेसर वँग झिचेंग यांनी १० चिनी भाषांतरित साहित्य त्यांना भेट दिले. शनिवारी सायंकाळी त्यांनी मोदी यांना ही भेट दिली.