आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात 20 स्मार्ट सिटी विकसित करण्यास मदत करा - मोदींचा आग्रह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - सिंगापूर माझ्यासाठी नवा देश नाही. तरीही हा देश मला दरवेळी नवी प्रेरणा देतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या देशाच्या दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी बोलताना सिंगापूरचे कौतुक केले. दोन्ही देशांत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाच्या परंपरेचा उल्लेख करून सिंगापूरच्या गुंतवणूकदारांना भारतात प्रचंड संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, भारत-सिंगापूर यांच्यात १० करारांवर स्वाक्ष ऱ्याही करण्यात आल्या.
मोदी म्हणाले, आशियामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे कार्य करत आहेत. सागरी मार्ग अधिक सुरक्षित व भयमुक्त करण्याच्या दृष्टीने तसेच सायबर सुरक्षेच्या मुद्यावर दोन्ही देश परस्परांना सहकार्य करत अाहेत. सिंगापूरच्या स्वातंत्र्याचा ५० वा वधार्धापनदिन दोन्ही देशांतील ५० वर्षांतील मैत्रिपूर्ण संबंधाची आठवण करून देत असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी अापल्या भाषणात नमूद केले.
२० स्मार्ट सिटीसाठी मदत करा
गुंतवणूकदारांना आवाहन करताना मोदींनी भारतात किमान वीस स्मार्ट सिटी उभ्या करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले. भारतात नवरत्न म्हणून ओळखल्या जाणा ऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेत सहभागी होऊन गुंतवणूक करावी, असेही मोदी म्हणाले. सिंगापूरमध्ये रूपी बॉंड तसेच इन्फ्रास्ट्रक्चर बॉंड जारी करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
बोलले तरी प्रसिद्धी मिळते
सिंगापुरातील भारतीयांसमोर बोलताना मोदी म्हणाले, सिद्धी आणि प्रसिद्धी यात खूप फरक आहे. प्रसिद्धी काय काहीही बोलले तरी मिळते. मात्र, सिद्धीसाठी तपच करावा लागतात. ज्यांनी प्रसिद्धीचा मार्ग स्वीकारला आहे ते काहीही मिळवू शकणार नाहीत. काही काळ ते बातम्यांतून झळकतीलही, परंतु हे लोक पृथ्वीवर एखादा बदल किंवा क्रांती करू शकत नाहीत.पंतप्रधानांचे हे भाषण म्हणजे आमिर खान याने सहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यावरील प्रतिक्रिया असल्याचे मानले जात आहे. मोदींनी आपल्या भाषणात कोठेही आमिरने केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला नाही.
१७० वर्षांपूर्वीचा नकाशा भेट दिला
पंतप्रधान मोदी यांनी लुंग यांना सिंगापूर बेटाचा १७० वर्षांपूर्वीच्या एका नकाशाची सत्यप्रत भेट दिली. चाडेचार वर्गफूट आकाराचा हा नकाशा १८४९ मधील आहे. १८४२-४५ या काळातील एका सर्वेक्षणावर आधारित हा नकाशा सिंगापूरमधील जलस्तर व उंचावरील वस्त्यांसंबंधीची माहिती देतो. ही प्रत दिल्लीतील भारतीय राष्ट्रीय अभिलेख विभागाने तयार केली आहे.
नेताजींना श्रद्धांजली, सेल्फीही...
मेमोरियल मार्करमध्ये मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली अर्पण केली. या स्मारकाजवळ शालेय मुलांसोबत त्यांनी सेल्फी पण काढली. या भागात १९९५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ११ स्मारके बांधण्यात आली आहेत.
सिंगापूर आशियाचा आर्थिक शेर
सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लुंग यांनी मोदी यांच्यासाठी शाही भोजचे आयोजन केले होते. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, आशियाई सिंह केवळ गुजरातमध्ये आढळतात. सिंगापूर मात्र आशियाचा शेर अाहे. जगासाठी सिंगापूर भारताचा "स्प्रिंग बोर्ड' व पूर्वेकडील द्वार आहे. आता या देशाची भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका आहे. मोदी यांनी लुंग यांना गुजरात भेटीचे निमंत्रणही दिले.