आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ModiInUS : मोदींनी सुधारणा केल्या पण सुविधा हव्या, टॉप CEO चे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॉर्च्यून 500 मध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांच्या सीईओंबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी. - Divya Marathi
फॉर्च्यून 500 मध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांच्या सीईओंबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी.
न्यूयॉर्क - अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Fortune 500 मध्ये सहभागी झालेल्या 40 टॉप CEO ची भेट घेतली. CEO बरोबर झालेल्या राऊंड टेबल कॉन्फ्ररन्समध्ये पंतप्रधानांनी भारतात गुंतवणुकीसाठी सूचना मागवल्या. त्यावेळी इंडस्ट्री लीडर्सने असे मत व्यक्त केले की, मोदींनी गेल्या एका वर्षामध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत, पण आम्हाला अधिक सुविधा हव्या आहेत. त्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या आठ मोठ्या फायनांशिअल कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. सरकार भारतात गुंतवणुकीचा मार्ग सोपा व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधानांनी अमेरिकेच्या मोठ्या कंपन्यांना सांगितले.

पंचप्रधानांची भेट घेणार्या टॉप CEO मध्ये भारतीय वंशाच्या अजय बांगा यांचाही समावेश आहे. अजय मास्टर कार्डचे सीईओ आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा झाल्याचे ते म्हणाले. भारत आणि चीनमध्ये जगातील अर्धी लोकसंख्या राहते. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. भारताने गुंतवणुकासाठी चांगले वातावरण तयार करायला हवे. चीनमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमुळे चिंता करायची गरज नाही, असेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले, परिस्थितीमध्ये सुधारणा
मोदी यावेळी म्हणाले की, 2014-15 मध्ये त्यांच्या सरकारने उचललेल्या पावलांमुळे जीडीपी 7.3% वर पोहोचला आणि देशामध्ये विदेशी गुंतवणूकही 40% वाढली आहे. गेल्या 15 महीन्यांमध्ये देशात टॅक्सेशन, एफडीआय, इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटबाबत काही महत्त्वाचे निर्णय झाले असून त्या माध्यमातून इनव्हेस्टमेंट आणि बिझनेससाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. मोदी म्हणाले, वर्ल्ड बँक, अांतरराष्ट्रीय मुद्राकोष आणि मूडीज सारख्या संस्थांनीही भारताचा आर्थिक विकास होणार असल्याचे मान्य केले आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले की, सर्व CEO नी इकॉनॉमिक रिफॉर्म्सचे कौतुक केले आहे. भारतामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची क्षमता असल्याचे सर्वांनी मान्य केल्याचेही ते म्हणाले.

अमेरिकेतील मीडिया दिग्गजांची भेट
CEO बरोबर बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील मोठ्या ब्रॉडकास्टींग कंप्यांच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली. यामध्ये न्यूज कॉर्प, 21st सेंच्युरी फॉक्स, सोनी, ईएसपीएन, डिस्कव्हरी अशा मोठ्या चॅनलच्या सीईओंचा समावेश होता. त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ब्रँड इंडियावर चर्चा केली.

शेख हसिनांची भेट
त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. यूएन समिटच्यापूर्वी दोन्ही नेत्यांची ही अौपचारिक भेट होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी यावर्षी जूनमध्ये त्यांच्या ढाका यात्रेदरम्यान झालेल्या निर्णयांच्या प्रगतीबाबत चर्चा केली.

वर्ल्ड मीडियाचे मत...
>वॉशिंग्टन पोस्ट
सिलिकॉन व्हॅलीमध्ये मोदींनी टेक दिग्गजांची भेट घेतली. तसेच भारतीय स्टार्टअप कम्युनिटीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतील. भारत ही एक मोठी बाजारपेठ असल्याचे सांगत गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल.
>द गार्डियन
नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा उद्देश भारताचे टेक्नोलॉजी गुडविल मजबूत करणे हा आहे. या दौऱ्याद्वारे मोदींना ग्लोबल आयटी इंडस्ट्रीशी संलग्न लोकांनी भारतात टेक्नॉलॉजी मॉडर्नायझेशनमध्ये योगदान देण्याची अपेक्षा आहे.
>वॉल स्ट्रीट जर्नल
मोदींनी देशाची ग्लोबल प्रोफाइल वाढवण्यासाठी आणखी एक यसस्वी प्रयत्न केला आहे. सत्तेत आल्यानंतर 16 महीन्यांतच मोदी भारताचे अमेरिकेशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले आहेत. चीन आशियामध्ये परराष्ट्र धोरणाने नेतृत्व करत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS