आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi To Arrive In Russia For Brics And Sco Summits

ब्रिक्स, SCO परिषदेसाठी मोदी रशियात, होऊ शकते शरीफ यांच्याशी भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाच्या उफामध्ये विमानातून उतरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. - Divya Marathi
रशियाच्या उफामध्ये विमानातून उतरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उफा - दोन मध्य आशियाई देशांच्या दौर्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स आणि शाघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तीन दिवसांच्या दौर्‍यावर उफा येथे पोहोचले. परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिकेत आर्थिक सहकार्य वाढवणे आणि आपल्या चलनात कर्ज देण्याच्या शक्यतेवर चर्चा होणार आहे.
रशियाच्या ऊफामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशीही भेट होण्याची शक्यता आहे. मोदींनी मात्र नवाज शरीफ यांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर मौन बाळगणेच पसंत केले.

पाकव्याप्त काश्मीरातील कॉरीडोअरबाबत आक्षेप नोंदवणार
पंतप्रधान या दौऱ्यादरम्यान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेटही घेणार आहेत. ते मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी उर रेहमान लखवी प्रकरणी भारताच्या प्रस्तावाच्या विरोधाबाबत चिंता व्यक्त करणार आहे. तसेच पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये चीनद्वारे तयार केल्या जाणाऱ्या कॉरीडोअर बाबतही आक्षेप नोंदवणार आहेत.

SCO चे सदस्यत्व मिळण्याची शक्यता
पंतप्रधान मोदी शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) च्या शिखर परिषदेतही सहभागी होतील. एससीओ संघटनेत चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताझिकिस्तान यांचा समावेश आहे. भारत त्याचा सदस्य नाही. पण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींनी या परिषदेचे निमंत्रण दिले आहे. भारत SCO मध्ये ऑब्झर्व्हर असून सदस्यत्वासाठी प्रयत्न करत आहे. 10 जुलैला भारताला स्थायी सदस्यत्व देण्याबाबत शिक्कामोर्तब होऊ शकते. रशियाच्या राष्ट्रपतींचे सहाय्यक युरी उसाकोव्ह यांनी भारताला सदस्यत्व देण्याची प्रक्रिया पुढील वर्षापर्यंत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पाकिस्तानलाही सदस्यत्व दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारत-पाकिस्तानला सदस्यत्व देण्याबाबत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींच्या रशियातील स्वागताचे PHOTOS