आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-ब्रिटनमध्ये 92 हजार कोटींचे करार, स्मार्ट सिटीत मिळणार मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- भारत आणि इंग्लंडचे सीईओ यांच्यात झालेल्या बैठकीत सहा क्षेत्रासाठी परस्पर सहकार्यावर सहमती झाली. स्मार्ट सिटी, डिजिटल इकॉनॉमी, आरोग्य, शिक्षण तसेच कौशल्य, अभियांत्रिकी, संरक्षण आणि आर्थिक तथा व्यावसायिक सेवांचा त्यात समावेश आहे. शुक्रवारी उभय देशांच्या कंपन्यांमध्ये ९२ हजार कोटी रुपयांच्या २८ सहमती करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

मोदींनी ब्रिटन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्यासोबत मॉर्निंग वॉकने केली. त्यानंतर ते महाराणी एलिझाबेथ यांनाही भेटले. त्या अगोदर गुरुवारी रात्री कॅमरूनने चेकर्स येथील निवासस्थानी मोदी यांच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले. गुरुवारी मोदी यांचा व्यग्र कार्यक्रम होता. गार्ड ऑफ ऑनर, द्विपक्षीय चर्चा, संयुक्त पत्रकार परिषद, ब्रिटिश संसदेतील मार्गदर्शन आणि लंडनचे आर्थिक संस्थेत भाषण झाले होते. त्यानंतर कॅमरून यांच्याकडून डीनर देण्यात आले. त्याठिकाणी मोदींनी मशरूम पुलाव, तडका दाल, अनेक प्रकारचे सलाड, आंब्यापासून बनलेल्या काही पदार्थांचाही आस्वाद घेतला.

मोदी यांनी कॅमरून यांना लाकूड, संगमरवर आणि हाताने तयार केलेला चांदीचा बुकेंड्स भेट म्हणून दिला. प्रत्येकामध्ये भगवद्गीतेच्या १३ व्या अध्यायातील श्लोक इंग्रजीतून अनुवादासह रेखाटण्यात आले आहेत.

महाराणी एलिझाबेथ दि्‍वतीय यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बकिंगहॅम राजमहालात दुपारचे जेवण घेतले. ते एलिझाबेथ यांच्यासोबत लंच करणारे दुसरेच पंतप्रधान आहेत. ४६ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एलिझाबेथ यांच्यासोबत लंच घेतला होता. मोदींना दाखवण्यासाठी महाराणींनी खास राजघराण्याच्या संग्रहातून वस्तू मागवल्या होत्या. मोदींनी महाराणींना त्यांच्या भारत दौऱ्याची छायाचित्रे, दार्जिलिंगचा चहा, तंजोईची शाल भेट दिली.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणतो सोशल मीडिया...
बातम्या आणखी आहेत...