आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडात पंतप्रधान मोदींनी केले \'दैनिक भास्कर\'च्या \'नो निगेटिव्ह न्यूज\'चे कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो- कॅनडा दौर्‍यावर असताना एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'दैनिक भास्कर'च्या 'नो निगेटिव्ह न्यूज' उपक्रमाचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदींनी टोरंटोमधील रिकोह स्टेडियमवर भारतीय लोकांना संबोधित केले. यावेळी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफेन हार्पर हे सपत्नीक उपस्थित होते.
मोदी म्हणाले, 'दैनिक भास्कर'चा 'नो निगेटिव्ह न्यूज' हा उपक्रम कौतुकास्पद आहे. वृत्तपत्रांमध्ये पॉझिटिव्ह न्यूज कॉलम (सकारात्मक बातमी) असावा, अशी इच्छा माजी राष्‍ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनीही व्यक्त केली होती. 'दैनिक भास्कर'ने पॉझिटिव्ह न्यूज कॉलम सुरु डॉ.कलाम यांची इच्छा पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे देशात सकारात्मक परिणाम जाणवताना दिसत आहे.
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाला सुरवात करण्यापूर्वी रिकोह स्टेडियममध्ये 'मोदी-मोदी' असा आवाज गुंजला. कॅनडातील भारतीय नागरिकांनी मोदींचा जयघोष केला. कॅनडातील भारतीय लोकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व सन्मानाबद्दल कॅनडाचे पंतप्रधान स्टीफेन हार्पर आणि तेथील जनतेचे आभार मानले.

मोदी म्हणाले, कॅनडाने फक्त माझाच नव्हे तर भारतातील सव्वाशे कोटी लोकांचा सन्मान केला आहे. कॅनडात राहाणार्‍या भारतीय लोकांमुळे मला येथे बहुमान मिळाला आहे. कॅनडातील भारतीय नागरिकांमुळे भारताचे नाव उज्ज्वल झाले आहे. कॅनडातील तीन दिवसीय दौरा आयुष्यभर माझ्या स्मरणात राहाणारा आहे. दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करत आहेत. भविष्यात कॅनडाकडून असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.
भारतात सरकारच नव्हे तर जन-मनही बदलले- मोदी
भारतात सरकारच नव्हे तर जन-मनही बदलले आहे. भारतात दहा महिन्यांपूर्वी भाजपने सरकार स्थापन केले. तेव्हापासून भारतात परिवर्तनाची लाट आली आहे. जन-धन योजनेची माहिती देताना मोदी म्हणाले, बॅंक अधिकार्‍यांनी घरा-घरात जाऊन लोकांचे खाते उघडले. मागील दहा महिन्यांत सुमारे 14 कोटी बॅंक खाते उघडण्यात आले. सर्व खाते 'झीरो बॅलेन्स'वर उघडण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर देशातील गरीब जनतेने त्यात 14 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. 'स्वच्छ भारत अभियान' यशस्वी झाल्याचे मोदींनी यावेळी सां‍गितले.
कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताचा केला गौरव...
कॅनडाचे पंतप्रधान स्टीफेन हार्पर यांनी भारतीय समुदायाला संबोधित करताना भारताचा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याची प्रशंसा केला. एक चहावाला ते पंतप्रधान असा मोदींचा संघर्ष प्रवासाचा हार्पर यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. कॅनडाचे भारतासोबत मैत्रीचे नाते आहे. दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यातून ते फुलवले आहे. कॅनडा भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. 'व्हिसा ऑन अरायव्हल' जाहीर केल्याने पंतप्रधान हार्पर यांनी भारताचे आभार मानले आहेत.

आठ 8 हजार लोक बसण्याची क्षमता असलेल्या स्टेडियम खच्चून भरले होते. पंतप्रधान मोदी स्टेडियमवर पोहोचण्यापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कलाकारांनी या रंगारंग कार्यक्रमातून प्रेक्षकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. यादरम्यान, सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंहने आपला परफॉर्म केला.

आपल्या भाषणात काय म्हणले पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाहा कार्यक्रमाचा Video आणि photos....