आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modis Visit To Bangladesh, Live Updates

मोदी म्हणाले- आता 2 दिवसांच्या दौऱ्याचे जगभरात पोस्टमॉर्टम केले जाईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बंगबंधू इंटरनॅशनल कनव्हेंशन सेंटरमध्ये भारतीयांना संबोधित करताना नरेंद्र मोदी.)
ढाका- भारत आणि बांगलादेशात झालेला जमीन हस्तांतरणाचा करार बर्लिनची भींत पाडण्यासारखा महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांमध्ये हा झाला असता तर त्याची भरपूर चर्चा झाली असती. माझा दौऱा संपल्यावर जागतीक पातळीवर याचे पोस्टमॉर्टम केले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगबंधू इंटरनॅशनल कनव्हेंशन सेंटरमध्ये भारतीयांना संबोधित करताना सांगितले.
नरेंद्र मोदी म्हणाले, की आज माझ्या दोन दिवसीय दौऱ्याचा अंतिम दिवस आहे. पण आता खरी यात्रा सुरु झाली आहे. आता जगाला समजेल, की भारत आणि बांगलादेश केवळ पास-पास नव्हे तर साथ-साथही आहेत. बांगलादेशाच्या समर्थनार्थ अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. मला बांगलादेशी नागरिकांबद्दल प्रेम आहे. दोन्ही देशातील तरुण पिढी ही आपली जमेची बाजू आहे.
तीस्ता पाणी तंट्यावर मोदी म्हणाले, की पाणी राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. याला आपण माणुसकीच्या भावनेतून बघायला हवे.
बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यावर मोदी म्हणाले, की आमच्या ताब्यात 90 हजार पाकिस्तानी जवान होते. आमची मानसिकता विकृत असती तर आम्ही काहीही करु शकलो असतो. पण आम्हाला बांगलादेशाची भूमी रक्तरंजित करायची नव्हती. आम्ही त्या जवानांना सोडून दिले.
बांगलादेश दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामिद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतानिमित्त विशेष भोजनाचे आयोजन केले. यात मोदींना मिष्टी दोई (वेगळ्या प्रकारचे गोड दही) वाढण्यात आले. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनाही उपस्थित होत्या. सध्या नरेंद्र मोदी बंगबंधु इंटरनॅशनल कनव्हेंशन सेंटरमध्ये भारतीयांना संबोधित करीत आहेत.
त्यापूर्वी त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची भेट घेतली. त्यांनी विरोधी पक्षनेत्या बेगम रौशन इरशाद आणि इतर राजकीय आणि उद्योजकांचीही भेट घेतली.
मोदींनी आज सकाळी सर्वात आधी ढाका येथील 800 वर्षे जुन्या ढाकेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींनी रामकृष्ण मिशन मठाला भेट दिली. यावेळी मोदींनी याठिकाणी मंत्रोच्चारही केला.
त्यानंतर मोदी माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्यावतीने 'फ्रेंड्स ऑफ बांगलादेश लिब्रेशन वॉर अवॉर्ड' स्वीकारण्यासाठी पोहोचले. वाजपेयींचे आरोग्य ठीक नसल्याने मोदींनी हा पुरस्कार त्यांच्यासाठी स्वीकारला. बांगलादेश स्वतंत्र जाला त्यावेळी अटलजींनी पत्र लिहून देशाच्या मुक्ति संग्रमासाठी लष्कर पाठवण्यास सांगितले होते.
मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासूनच याठिकाणी जय्यत तयारी करण्यात येत होती. मोदींच्या या दौऱ्याने भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी राष्ट्रांच्या संबंधांमध्ये सुधारणा झाली आहे. याचा फायदा व्यापारवृद्धीसाठी होऊ शकतो. ईशान्येकडील राज्यांचा विकास साधण्यात बांगलादेश मोलाची भूमिका बजावू शकतो, याची जाणीव मोदी यांनी आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींच्या दौऱ्याचे PHOTO