आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Visit: PM Has \'no Time\' For Wharton Felicitation

US दौरा : ज्‍या शाळेने रद्द केले होते भाषण, त्‍या शाळेतील कार्यक्रमाला आता \'ना\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - वर्ष 2013 ज्‍या अमेरिकेच्‍या व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम या जगप्रसिद्ध शाळेने चर्चासत्राचे आयोजन केले होते. यात गुजरातचे तत्‍कालीन मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांचासुद्धा सहभाग होता. मात्र, गुजरात दंगलीला मोदीच जबाबदार असल्‍याचा आरोप तीन शिक्षकांनी केला. त्‍यामुळे मोदी यांचे भाषण रद्द करण्‍यात आले होते. आता त्‍याच शाळेने मोदी यांचा सत्‍कार सोहळा आयोजित केला आहे. पण, पंतप्रधानाच्‍या अमेरिका दौऱ्याचा कार्यक्रम खूप व्‍यस्‍त असल्‍याने हा कार्यक्रम रद्द करण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात आले.
एका सप्‍ताहापूर्वी केले स्‍पष्‍ट
हा कार्यक्रम रद्द करावा, अशी सूचना भारतीय पंतप्रधान कार्यालयाने एका सप्‍ताहापूर्वीच बी-स्कूलला दिली. मात्र, या बाबत शाळा प्रशासनाकडून काहीही प्रतिक्रिया देण्‍यात आली नाही.
2013 मध्‍ये नेमके काय झाले होते
वर्ष 2013 मध्‍ये अमेरिकेतील एका चर्चासत्रात नरेंद्र मोदी भाग घेणार होते. मात्र, मोदी यांना मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिका सरकारने व्हिसा नाकारला होता. शिवाय व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमने मोदी यांचे आयोजित केलेले बीजभाषण रद्द केले होते. पेनसिल्वानिया विद्यापीठातील अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविल्याने या प्रतिष्ठेच्या परिषदेतील मोदी यांचे बीजभाषण रद्द करण्यात आले.
यंदाही कडाडून विरोध
पंतप्रधान मोदी हे 23 ते 28 सप्‍टेंबरदरम्‍यान अमेरिकेच्‍या दौऱ्यावर आहेत. पण, याही वेळी त्‍यांच्‍या या दौऱ्याला अमेरिकेतील 100 प्राध्‍यापक आणि अनेक विद्यार्थ्‍यांकडून विरोध केला जात आहे. या बाबत त्‍यांनी यूएस टेक्नोलॉजी एग्‍झीक्यूटिव्‍यला पत्र लिहिले आहे. यात म्‍हटले, मोदी यांनी भारताला संपूर्ण डिजिटल करण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे. यात इंटरनेटचा वापर वाढणार आहे. पण, या योजनांमध्‍ये सीक्रेसी आणि सिक्युरिटीचा अभाव आहे. त्‍यामुळे भविष्‍यात भारतीयांच्‍या मूलभत अधिकारांवर गदा येऊ शकते, असे कारण देत पंतप्रधानाच्‍या या दौऱ्याला विरोध केला जात आहे.