आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Department Of Russia Release Brochure To Avoid Accidents While Taking Selfie

Selfie काढा पण जीव सांभाळा, अपघात टाळण्यासाठी पोलिसांचे पत्रक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेल्फी हा सध्या सगळीकडेच चर्चा असणारा विषय आहे. कार्यक्रम काहीही असो प्रत्येकाची आपली सेल्फी घेण्यासाठी घाई चाललेली असते. पण अनेकदा काही बहाद्दर सेल्फीसाठी असे प्रयोग करत असतात की, त्यामुळे अगदी त्यांच्या जीवावर बेतत असते. रशियामध्ये अशा प्रकारे सेल्फी काढताना होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी एक पत्रकच तयार केले आहे. त्यातून सेल्फी काढताना काय करू नये किंवा कोणत्या ठिकाणी सेल्फी धोकादायक ठरू शकते ते सांगण्यात आले आहे.
रशियात यंदा सेल्फी काढताना सुमारे १०० अपघात झाले असून त्यात १० जणांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. त्यामुळेच पोलिसांनी अशा प्रकारे पत्रके वाटण्यास सुरुवात केली आहे. एक सेल्फी तुमच्या जीवावर बेतू शकते, असा संदेथ त्यात देण्यात आला आहे.
या दोन पानी पत्रकामध्ये काही दिशानिर्देश देण्यात आले आहेत. तसेच चिन्हांमधून कशा प्रकारे सेल्फी काढू नये हे दाखवण्यात आले आहे. रस्ते सुरक्षेसाठी ज्याप्रकारचे चिन्हं वापरले जातात, तसेच चिन्हं यासाठी वापरण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकवर रेल्फी घेताना अपघातात एका तरुणाचा प्राण गेल्याचे उदाहरणही त्यात मांडण्यात आले आहे. त्याचप्रकारे प्राणी, घराच्या छतावर, उंच इमारतींवर सेल्फी घेणेही धोकादायक ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात जनजागृतीसाठी खास वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे. या वेबसाईटवर सेल्फी घेताना झालेले अपघात किंना अनुभवही मांडता येणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, काही अफलातून आणि तेवढेच Dangerous Selfie...
सेल्फी काढताना डोक्याला धडकली रेल्वे तरीही तरुण सुखरुप... VIDEO पाहा अखेरच्या स्लाइडवर...