आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्र्याच्या घरी सुटकेसमध्ये आढळल्या नोटा, 7 मशिन्सनी रात्रभर सुरू होती मोजदाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी मंत्र्याच्या घरी एवढ्या नोटा आढळल्या. - Divya Marathi
माजी मंत्र्याच्या घरी एवढ्या नोटा आढळल्या.
साओ पाउलो - ब्राझीलमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नजरकैदेत असलेल्या माजी मांत्री गेडेल वियरा लिमा यांच्या एका फ्लॅटवरून नोटांनी भरलेले अनेक सुटकेस आढळले. रकमेची मोजणी करण्यासाठी 7 मशीनचा आधार घ्यावा लागला. तरीही रात्रभर मोजदाद सुरूच होती. तथापि, भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकल्यानंतर या वर्षीच्या जुलैपासूनच त्यांना त्यांच्या घरात नजरकैद करण्यात आले आहे.
 
 8 सुटकेस आणि पुठ्ठ्याच्या 5 बॉक्समध्ये भरलेल्या होत्या नोटा...
 - नॉर्थ-ईस्टर्न सिटी साल्वाडोरमध्ये उपस्थित एका अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी रेड टाकली, येथून ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
 - पोलिसांनुसार, हे अपार्टमेंट माजी मंत्री गेडेल वियरा लिमा हेच वापरत होते.
 - येथे पोलिसांना नोटांनी भरलेल्या 8 सुटकेस आणि पुठ्ठ्याचे 5 बॉक्स आढळले.
 - एवढ्या नोटा मोजण्यासाठी 7 कॅश काउंटिंग मशीन आणण्यात आल्या, याद्वारे रात्रभर मोजणी सुरूच होती.
 - लोकल मीडियाला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळपर्यंत अर्धी रक्कम मोजली होती, ती तब्बल 67.97 कोटी रुपये आहे.
- पोलिसांनुसार ही रक्कम राज्याच्या मालकीची बँक कैक्सा इकोनॉमिका फेडरलची असून एका फ्रॉडच्या तपासादरम्यान मिळाली.
- लिमा कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते.
- भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आले होते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...