आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणिताच्या गृहपाठातही पोलिस मदत करतात तेव्हा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस नियंत्रण कक्षात येणारे फोन सहसा एखाद्या आपत्कालीन स्थितीत पोलिसांची मदत मागण्यासाठी येतात. नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेला विभाग फेसबुक आणि ट्विटरवरदेखील अपडेट असतो. अमेरिकेच्या ओहयो राज्यात एका अलर्ट मेसेजला ड्यूटीवर तैनात पोलिस अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ओहयो पोलिस विभागाच्या फेसबुक पेजवर इयत्ता पाचवीमधील लीना ड्रेपर या विद्यार्थिनीचा मेसेज आला. त्या वेळी नियंत्रण कक्षात लेफ्टनंट बीजे ग्रुबर उपस्थित होते. त्यांनी लीनाच्या मेसेजला तत्काळ उत्तर दिले. तिचा मेसेज पुढीलप्रमाणे होता-  
लीना : मला गृहपाठ करताना थोडी अडचण येत आहे. तुम्ही मला मदत कराल का? 
पोलिस : मी तुझी काय मदत करू शकतो? 
लीना : (8+29) x 15 हे मला सोडवता येत नाहीय.  
पोलिस : सर्वप्रथम कंसात दिलेल्या बेरजेचे उत्तर काढावे. त्याचे उत्तर 37x15 असे येईल. यातून गणिताचे पुढचे उत्तर शोधावे.  
 
लीनाने त्यानंतरही आणखी एक गणित विचारले. पोलिसांनी त्याचे उत्तर दिले. पोलिस अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे मदत केल्यामुळे लीनाच्या आईने समाधान व्यक्त केले आहे. पोलिस विभागाने नागरिकांच्या संपर्कात राहून केलेली ही मदत उत्तमच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. लीनाच्या आईने केलेल्या पोस्टला प्रतिक्रिया देताना पोलिस विभाग म्हणाले की, आम्हाला नागरिकांची मदत करायला आवडते. पुढच्या वेळी असे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ‘लाइफलाइन’चाही वापर करू. मुलांची मदत करायलाही आम्हाला आवडते. }facebook.com
 
बातम्या आणखी आहेत...