आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूर ISIS दहशतवाद्यांचे स्वतंत्र पोलिस, आदेश फेटाळणा-यांना देते फाशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका आरोपीला फाशी देताना ISIS चे पोलिस. - Divya Marathi
एका आरोपीला फाशी देताना ISIS चे पोलिस.
फोटोमध्ये तुम्ही इस्लामिक स्टेट (ISIS)चे स्वतःचे पोलिस पाहत आहात. हे बंदूकधारी दहशतवादी शहरावर लक्ष ठेवून असतात. सुन्नी दहशतवाद्यांनी आरोपींना कैदेत ठेवण्यासाठी जेलही तयार केले आहे. रिपोर्ट्सनुसार ISIS चीफ अबू बक्र अल बगदादी यांचा आदेश न ऐकणाऱ्यांना येथे सर्वांसमोर सुळावर लटकवले जाते.
दिली जाते क्रूर शिक्षा
रिपोर्टसनुसार इस्लामिक स्टेटमध्ये ईशनिंदा, व्यभिचार, समलैंगिक संबंध, हेरगिरी, धर्म बदलणे, लूटमार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. त्याशिवाय मद्यपान करणाऱ्यांना चाबकाचे फटके देण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर चोरीच्या आरोपींचे हात पाय कापण्याची शिक्षाही दिली जाते.

इस्लामिक स्टेटने महिलांकडून शरिया कायद्याचे कठोर पालन व्हावे यासाठी खास खान्सा ब्रिगेड तयार केले आहे. त्यात केवळ महिला असतात. त्यांचे काम शरिया नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिला आणि तरुणींना शिक्षा देणे हे आहे. रिपोर्ट्स नुसार बुरख्याचे कापड पातळ असले तरी महिलांना शिक्षा भोगावी लागते.
जून 2014 मध्ये ईशान्य इराक आणि सिरियाच्या अनेक गावांवर ताबा मिळवल्यानंतर सुन्नी दहशतवाद्यांच्या ISIS या संघटनेने 'इस्लामिक स्टेट'ची घोषणा केली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी पोलिसांचे फोटो..