आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Officer Fire 16 Rounds And Killed Black Youth In US, Court Says

VIDEO: अमेरिकेत पोलिसाने अश्वेत तरुणावर 16 गोळ्या झाडल्या, आरोपपत्र दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागो (अमेरिका)- तब्बल 16 गोळ्या झाडून अश्वेत तरुणाला ठार मारल्या प्रकरणी पोलिस अधिकारी दोषी असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी ठेवला आहे. गेल्या वर्षी झालेल्या या घटनेनंतर अमेरिकेत अश्वेत नागरिकांनी उग्र आंदोलन पुकारले होते.

या घटनेचा व्हिडिओ शिकागो पोलिसांनी नुकताच जाहीर केला. त्यानंतर सुमारे 500 आंदोलकांनी शिकागो पोलिस मुख्यालयावर मुकमोर्चा काढला होता. या व्हिडिओत पोलिस दलात 14 वर्षे सेवा देणारा जॅसन व्हॅन डीक अश्वेत तरुणावर गोळ्या झाडताना दिसून येतो. अश्वेत तरुणाचे नाव लॅक्वॅन मॅकडोनल्ड असे होते. त्याच्याजवळ चाकू होता.
मॅकडोनल्ड हा पोलिसांपासून बऱ्याच अंतरावर होता. तरीही जॅसन याने त्याच्यावर गोळीबार केला. त्यावर तब्बल 16 गोळ्या झाडल्या. सर्व गोळ्या त्याच्या शरीराच्या वरच्या भागाला लक्ष्य करुन झाडण्यात आल्या होत्या. जॅसनच्या पिस्तुलात जेवढ्या गोळ्या होत्या त्या सर्व त्याने झाडल्या होत्या, असे दिसून आले.
यासंदर्भात शिकागो पोलिस आयुक्त जेरी एफ मॅककार्थी म्हणाले, की या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याने तरुण व्यक्तीचा जीव घेतला आहे. त्याला याचा जाब द्यावा लागेल. कारवाईला सामोरे जावे लागेल. लोकांना शांततेने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्यांना बोलण्याचा, विरोध प्रदर्शन करण्याचा, आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण गुन्हेगारी कृत्ये करण्याचा नाही.