आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांच्यासाठी चोर, माझ्यासाठी मात्र ‘ती’ होती अगतिक माता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांसह साराह रॉबिन्सन - Divya Marathi
मुलांसह साराह रॉबिन्सन
न्यूयॉर्क - एखादा गरीब चोरी करताना आढळून आल्यास त्याच्याशी पोलिसांचा व्यवहार कसा असतो, हे तुम्ही पाहिले असेल; परंतु अमेरिकेच्या कॉन्सस प्रांतातील रोलेंड पार्क शहरातील एका पोलिस अधिकाऱ्याने मात्र आदर्श उदाहरण घालून दिले. चोरीच्या आरोपाखाली पकडलेल्या महिलेला चोरीचे सामान स्वत: खरेदी करून दिले. त्यासाठी त्याने १९ हजार रुपये खर्चही केला.

स्थानिक वॉलमार्ट स्टोअरमध्ये चोरी झाल्याची माहिती रोलेंड पार्कचे पोलिस अधिकारी मार्क अँग्रावेल यांना मिळाल्यानंतर ते तेथे पोहोचले. आरोपी महिलेशी अट्टल चोराप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचे त्यांनी पाहिले. महिलेचे नाव साराह रॉबिन्सन होते. अँग्रावेल यांनी तिला अटक करण्याऐवजी तिच्याशी संवाद साधला. त्यानंतर सदर महिला सहा मुलांची माता असल्याची माहिती अँग्रावेल यांना मिळाली. पतीचे २०११ मध्ये निधन झाले होते. तेव्हापासून तिचे कुटुंब संघर्ष करू लागले. ती बेघर झाली असून आपल्या कारमध्येच त्यांचा मुक्काम होता; परंतु काही दिवसांपूर्वी कारचीही चोरी झाली. रॉबिन्सन म्हणाल्या, बाळासाठी वाइप्स, शूज, डायपरची चोरी करत होत्या. अँग्रावेल यांना तिची काही मुले अनवाणी दिसले. त्यांची हकिगत ऐकून अँग्रावेल यांच्यातील माणुसकी जागृत झाली. ते लगेच वॉलमार्टमध्ये गेले. त्यांना हव्या असलेल्या वस्तू अँग्रावेल यांनी खरेदी केल्या. अँग्रावेल म्हणाले, वॉलमार्टच्या दृष्टिकोनातील त्या एक गुन्हेगार होत्या; परंतु त्या परिस्थितीपुढे अगतिक झाल्या होत्या. त्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागत आहे. माझीही दोन मुले आहेत. म्हणून मी त्या मातेच्या भावना समजू शकतो.

पूर्वी मुलाचे प्राण वाचवणारा अधिकारी
मार्क अँग्रावेल यांनी याअगोदरही आपल्यातील हिंमत आणि औदार्याचे दर्शन घडवलेले आहे. याच वर्षी सुरुवातीला कॉन्सस शहरात एका बालकास त्यांनी मदत केली होती. त्या मुलाचा श्वास गुदमरत होता. तो संकटात होता. अँग्रावेल यांना त्याबद्दल पुरस्कारही मिळाला होता. ताज्या घटनेमुळे अँग्रावेल प्रसारमाध्यमातील हीरो ठरले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, घटनेशी सबंधीत फोटो