पटियाला (पंजाब)- येथील एका शेतात मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा सापडला आहे. यात 250 काडतुस (9 एमएम), एक रायफल (30 बोअर), तीन हॅंडग्रेनेड, मोर्टार आणि चार बॉम्बचा समावेश आहे. लष्कराच्या निवृत्त जवानाने शेतात ही शस्त्रे गाडून ठेवली होती. आता या जवानाचा मृत्यू झाला आहे.
कर्नल गुरुचरणसिंग यांच्या भावाचा मुलगा हरविंदरसिंग उर्फ हॅपी यांनी सांगितले, की माझ्या काकाने सुमारे 30 वर्षांपूर्वी ही शस्त्रे जमिनीत गाडून ठेवली होती. दहशतवाद्यांना विकण्यासाठी त्यांनी लष्करातून ही शस्त्रे आणली होती. पोलिस आणि लष्कराचे जवान मिळून या प्रकरणाचा तपास करीत आहेत. गुरुचरणसिंग यांच्यावर विविध कलमांन्यवे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी मिळाली गोपनिय माहिती
पोलिसांनी सांगितले, की रिठखेडी गावातील एका शेतात शस्त्रे जमिनीखाली लपवून ठेवण्यात आले आहेत, याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर जसविंदरसिंग टिवाणा यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम तपासणीसाठी पाठविण्यात आली. शेतात काही ठिकाणी खणण्यात आले. तेव्हा जमिनीतून शस्त्रे बाहेर आली.
गुरचरणसिंग यांचा 2010 मध्ये मृत्यू
सुमारे 15 वर्षांपूर्वी गुरचरणसिंग भारतीय लष्करातून निवृत्त झाले. 2010 मध्ये रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी राजिंदर कौर, एक मुलगा आणि मुलगी अमेरिकेत शिफ्ट झाले. आता त्यांच्या भावाचा मुलगा या शेतात काम करतो.
पुढील स्लाईडवर बघा, गुरचरणसिंग यांच्या शेतात सापडलेली शस्त्रे....