आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेमोक्रॅटिकच्या जाहीरनाम्यातून पाकिस्तानवर ‘दबाव’, ‘डेमोक्रॅटिक पार्टीचे धोरण स्पष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस वाढत असतानाच सत्ताधारी डेमोक्रॅटिक पार्टीने आपल्या जाहीरनाम्यात भारताला ‘महत्त्वाची शक्ती’ म्हणून संबोधले आहे. त्यामुळे सामरिक संबंधात काहीही बदल करण्यात येणार नाही. मात्र, पाकिस्तानने दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये यासाठी त्या देशावर ‘दबाव’ वाढवण्याची भूमिका घेतली आहे.

देशात नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा शुक्रवारी आैपचारिकरीत्या घोषित करण्यात आला. भारतासोबतची सामरिक भागीदारी सध्यासारखी सुरूच राहणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही, वैविध्यता जपणारा भारत महत्त्वाची शक्ती ठरतो. भारतासह इतर देशांसोबतही अमेरिकेचे पूर्वीप्रमाणेच सामरिक संबंध राहतील यावर डेमोक्रॅटिकचा भर असेल. मात्र, पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्द्यावर दबाव वाढवण्याची नीती कायम ठेवण्यात येईल, असे जाहीरनाम्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. जाहीरनाम्यास ‘डेमोक्रॅटिक पार्टी प्लॅटफॉर्म’ असे नाव देण्यात आले आहे.

ट्रम्प यांना फटकारले
डेमोक्रॅटिकच्या जाहीरनाम्यातून रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिम समुदायाबद्दलच्या भूमिकेला पक्षपाती धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हटले आहे. लष्कराने इतर देशांतील युद्धात सहभागी व्हावे ही त्यांची भूमिकाही आम्ही नाकारतो.

आणखी कोणते मुद्दे ?
उत्तर कोरियाच्या आक्रमकतेला वेसण घालण्यासाठी प्रयत्न केले जातील. चीन नियमाने राहतो का, यावर लक्ष केंद्रित केले जाईल. गैरमार्गाने व्यापार, चलन दरातील गडबड सायबर हल्ले यासारखा खोडसाळपणा चीन करतो. त्यावर निगराणी ठेवली जाईल, असे डेमोक्रॅटिकच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्याशिवाय मानवी हक्क, तिबेटचे हक्क इत्यादींचाही समावेश त्यात करण्यात आला आहे. स्थलांतरितांना वैध मार्गाने अमेरिकेत येण्याचे डेमोक्रॅटिकने समर्थन केले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आैपचारिक घोषणा याच महिन्यात
बातम्या आणखी आहेत...