आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान; मॅक्रो-ली टक्कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रान्समध्ये रविवारी राष्ट्राध्यक्ष पदासाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यात जनता नवा इतिहास लिहिणार आहे. इमॅन्युएल मॅक्रो व कट्टरवादी मरीन ली पेन यांच्यात ही टक्कर अपेक्षित आहे. मॅक्रो जिंकल्यास ते फ्रान्सचे पहिले सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरतील. ते ३९ वर्षांचे आहेत. ली पेन विजयी झाल्यास त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होतील.

निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या चार मिनिटे अगोदर मॅक्रो यांच्या पदाधिकाऱ्यांच्या इ-मेल हॅक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या हॅकिंगमागे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा हात असल्याचा आरोप आहे. अमेरिकेतील निवडणुकीत देखील हिलरी क्लिंटन यांचे इ-मेल देखील हॅक झाले होते. ट्रम्प विजयी व्हावे, असे पुतीन यांना वाटते. त्यानुसार ट्रम्प यांचा विजय झाला होता. फ्रान्समध्ये आं मार्शेच्या मॅक्रो आपले प्रतिस्पर्धी ली पेन यांच्यापेक्षा २४ गुणांनी आघाडीवर आहेत. मॅक्रो यांच्या इ-मेल हॅक झाल्या आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो, असा अंदाज निवडणूक जाणकारांनी केला आहे. दरम्यान फ्रान्समध्ये हॅकिंगच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मॅक्रो यांच्या पक्षाने मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान, हॅक करण्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी फेटाळून लावला आहे. 
 
काय-काय झाले जगजाहीर ? 
- एकूण सुमारे ९ गीगाबाइटची माहिती फुटली
- मॅक्रोच्या पक्षांचे पदाधिकाऱ्यांचे खासगी व व्यावसायिक इ-मेल.
- निवडणूक मोहिमेच्या आर्थिक ताळेबंदाचा दस्ताऐवज. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...