आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्‍वस्त देशाची कहाणी, मुली दुसरी-तिसरी पत्नी होण्‍यासाठीही आहेत तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस - सीरियात सुरु असलेल्या यादवी युध्‍दाने पूर्णपणे या देशाला उद्ध्‍वस्त केले आहे. येथे लाखो जणांनी आपला जीव गमावला असून अनेकांनी देश सोडला आहे. याचा परिणाम म्हणजे देशात पुरुषांची संख्‍या घटली आहे. एकट्या राहणा-या व विधवा स्त्रियांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तरुणींना जबरदस्तीने दुसरी किंवा तिसरी पत्नी होण्‍याचा निर्णय घ्‍यावा लागत आहे. दुसरीकडे पुरुषांनाही निराधार महिलांची जबाबदार स्वीकारण्‍यासाठी नाइलाजास्तव विवाह करावे लागत आहे. 70 टक्के महिला अविवाहित...
- 2010 च्या तुलनेत 2015 पर्यंत देशात बहुविवाहांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
- दमास्कसमध्‍ये नोंदणी होत असलेल्या विवाहांमध्‍ये अशा प्रकारच्या विवाहांचे प्रमाण जवळपास 30 टक्के आहे.
- देशात महिलांची संख्‍या पुरुषाच्या तुलनेत खूप मोठी आहे. यात 70 टक्के महिला अविवाहित आहेत.
- न्यायाधीश मेहमूद अल-मारावीनुसार, देशात पुरुषांपेक्षा जास्त महिला आहेत. अशा स्थितीत धार्मिक व कायद्यानुसार बहुविवाह हा एकच पर्याय आहे.
- ब-याच महिलांना हालाखीची आर्थिक स्थिती, तर काहींना सुरक्षेसाठी दुसरी पत्नी होण्‍याचा निर्णय घ्‍यावा लागत आहे.
- मानसशास्त्रज्ञ लैला अल-शेरिफ म्हणाल्या, की पूर्वी ज्या महिला अशा विवाहांसाठी तयार नव्हत्या, त्याही आता संरक्षणासाठी दुस-री पत्नी बनायला तयार आहे.
- परिस्थिती अशी आहे, की महिला वयाने दुप्पटीने मोठे असलेल्या पुरुषांबरोबर आयुष्‍य जगायला तयार आहे. ही मंडळी त्यांना शरीरसंबंध किंवा दुसरा विवाहाचा प्रस्ताव देत आहेत.
जीवनसाथीच्या प्रतिक्षेत महिला
- 32 वर्षांची शुकरान त्या महिलांपैकी एक आहे जिला आताही जीवनसाथीदाराची प्रतिक्षा आहे.
- तो कुटुंबवत्सल असावा, अशी तिची अपेक्षा आहे.
- तिच्या बहुतेक पुरुष मित्र व सहकार्यांचे एकतर मृत्यू झालाय किंवा त्यांनी देशही सोडलाय.
- शुकरान म्हणते, येथे आपल्यासाठी परिपूर्ण वरस्थळ शोधणे खूप अवघड काम आहे.
- शुकरानच्या मतानुसार, सीरिया सर्वधर्म व समुदायांच्या लोकांचा जमाव बनला आहे.
- तिचा प्रियकर ख्रिश्‍चन होता व ती मुस्लिम. यामुळे तिचा विवाह होऊ शकला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...