आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोप यांच्या मध्यस्थीने अमेरिका-क्युबा समेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅटिकन सिटी - क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो रविवारी व्हॅटिकन शहरात दाखल झाले. ख्रिश्चन धर्मीयांचे जागतिक गुरू पोप फ्रान्सिस यांनी अमेरिका आणि क्युबा यांच्यातील समेट घडवून आणल्याबद्दल ‘ऋण’ व्यक्त करण्यासाठी ते भेटीवर आले होते.

अमेरिका आणि क्युबा यांच्यातील ५० वर्षांचे वैर संपुष्टात आणण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले होते, असे व्हॅटिकनकडून रविवारीच स्पष्ट करण्यात आले. अमेरिका आणि क्युबा यांनी नवे राजकीय नाते निर्माण केले पाहिजे, असे वक्तव्य लॅटिन अमेरिकेतून बनलेले पहिले पोप फ्रान्सिस यांनी डिसेंबरमध्ये केले होते. त्या वक्तव्याने सर्वांनाच धक्का दिला होता.

पोप यांनी ऑक्टोबरमध्ये गुप्तरीत्या व्हॅटिकन सिटीमध्ये अमेरिका आणि क्युबाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. रविवारच्या बैठकीबद्दल व्हॅटिकन म्हणाले, ही बैठक मात्र अतिशय वैयक्तिक स्वरूपाची आहे. माॅस्कोमध्ये त्याची घोषणा झाली .

पोप जॉन पॉल
द्वितीय यांचे प्रयत्न
विद्यमान पोप फ्रान्सिस यांनी पोप जॉन पॉल द्वितीय यांचे काम पुढे नेण्याचे कार्य केले आहे. ते १९९८ मध्ये क्युबाला गेले होते. क्युबाने आपली दारे जगासाठी खुली केली पाहिजेत. त्याचबरोबर जगानेदेखील क्युबासाठी आपली दारे उघडली पाहिजेत. दरम्यान, पोप फ्रान्सिस सप्टेंबरमध्ये क्युबाच्या दौ-यावर जातील.