आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पॉप गायकाने केल्या आहेत 300 सर्जरी, असा चेहरा बिघडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडचा पॉप स्टार पीट बर्न्सला स्वत:चा कंटाळला आहे. - Divya Marathi
इंग्लंडचा पॉप स्टार पीट बर्न्सला स्वत:चा कंटाळला आहे.
इंटरनॅशनल डेस्क - इंग्लंडचा पॉप स्टार पीट बर्न्सला स्वत:चा कंटाळला आहे. वास्तविक चेहरा बरा करण्‍यासाठी त्याने आतापर्यंत 300 सर्जरी केल्या आहेत. एका ऑपरेशन त्याच्या जीवावर बेतले होते. 57 वर्षांच्या या पॉप गायकानुसार, चेह-याच्या सर्जरीकडे पाहण्‍याचे सोडून दिले आहे. याने आपली आपबीती एका वाहिनीला सांगितली आहे. देवही मला ओळखून शकणार नाहीत...
- तो विनोदाने म्हणतो, मी जेव्हा देवाजवळ जाईल तेव्हा मला देवही ओळखणार नाही.
- 20 वर्षांपूर्वी 'यू स्पिन मी राऊंड' गाणं लो‍कप्रिय झाल्यानंतर त्याला चेह-यात बदल करण्‍याचे वेड लागले.
- त्याने सांगितले, की ब-याच वर्षांपूर्वी लिव्हरपूलमध्‍ये एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला होता. यात त्याचे नाक तिरपे झाले होते.
- पीटने नाक सरळ करण्‍यासाठी ऑपरेशन केले. मात्र दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला वाटले की आपल्याबरोबर काहीतरी चुकीचे घडले.
- त्याच्या चेह-यावर रक्तच रक्त होते. त्याला काहीच कळाले नाही.
- कारण त्याला एका पॉप कार्यक्रमाला हजेरी लावायची होती. त्याने नाक झाकण्‍याची विचार केला.
- यानंतर त्याने दुस-यांदा सर्जरी केली. यात डॉक्टरने त्याला वेगवेगळे उपचार दिले.
उत्कृष्‍ट पाऊटसाठी केली सर्जरी
- पीट म्हणाला, की नाकाच्या सर्जरीबरोबरच त्याने गालांचे व ओठांचे ऑपरेशन केले. मात्र हे त्याच्यासाठी वाईट स्वप्न ठरले.
- पीटला एक चांगले पाऊटही हवे होते. यासाठी त्याने लिप किंग ऑफ लंडन' म्हटले जाणा-या सर्जनकडून लिप फिलर करुन घेतले.
- यामुळे त्याच्या ओठांची जळजळ व्हायला लागली. त्याचे ओठ कोणत्यातरी लिक्विडने भरले होते.
- पीट पुन्हा या सर्जनाजवळ गेला व ओठांची जळजळ थांबवण्‍यासाठी उपचार घेतले.
- सर्जनने त्याला दोन इंजेक्शन दिले. लिक्विड उलटीप्रमाणे ओठातून बाहेर यायला लागले.
- आता असे झाले की परमानंट फिलर ओठांना लावले गेले होते. ते पूर्ण चेह-यावर पसरले. चेह-यावर फोडी आल्या व त्यातून पू निघू लागले.
- यानंतर पीटची अवस्था खूप खालवली व त्याला हॉस्पिटलमध्‍ये नेण्‍यात आले.
- त्याचे ओठ बरे करण्‍यासाठी त्याच्या पोटातून कातड काढण्‍यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा पीटचे छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...