आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोप फ्रान्सिस यांच्यावर अाधारित इंटरनेट गेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोप फान्सिस यांच्या दौऱ्याच्या सन्मानार्थ पेराग्वेच्या लोकांनी पापारोड नामक इंटरनेट गेम बनवला आहे. गेमचे लक्ष पोप यांच्या कारला खड्ड्यांमधून सावधतेने काढणे आहे.
ओबामा केअर
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या (२४ ते २६ जुलै) केनिया दौऱ्यापूर्वी राजधानी नैरोबी सजवण्यात येत आहे. खड्डे बुजवले जात आहेत. नवीन पथदीप लावण्यात आले आहेत. फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. टीकाकारांनी याला ओबामा केअर नाव दिले.

फक्त दोनवेळा गोळीबार
नाॅर्वेच्या पोलिसांनी २०१४ मध्ये नवीन रेकॉर्ड बनवला. त्यांनी फक्त दोन गोळीबार केले. यात कुणीही जखमी झाले नाही.

रुजवेल्टचे घर
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थ्योडोर रुजवेल्टने न्यूयॉर्क राज्यामध्ये सागामोर हिल्स येथील घराच्या नूतनीकरणावर ६४ कोटींचा खर्च केला. २०११ पासून हे घर उघडण्यात आले.

सेल्फीने धोका
रूसमध्ये सेल्फी घेताना झालेल्या अनेक दुर्घटना पाहता रशियन अधिकाऱ्यांनी गाईडलाईन बनवली आहे. यात सेल्फी घेण्याचे सुरक्षित प्रकार सांिगतले आहेत.

नवीन व्हिडिओ गेम
एचबीओ चॅनल गेम ऑफ थ्रोन्सचे खास आकर्षण गेम-रिस्क प्रदर्शित करणार आहे.ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणाऱ्या गेमची किंमत ४७०० रुपये असेल.

वेदनाशामक इबूप्रोफेनमुळे हृदयविकाराचा धोका
अमेरिकन औषध प्रशानाने इबूप्रोफेनसारख्या वेदनाशामकांवर देण्यात येणाऱ्या सूचनांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर शक्यतेच्या जागी लिहिले असेल की, याद्वारे हृदयविकाराचा धोका आहे. संस्थेचा सल्ला आहे की, तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर, अशा वेदनाशामक कमी प्रमाणात सेवन करा.
बातम्या आणखी आहेत...