आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pope Francis Reforms Marriage Annulments Allowing Divorced In Church

आता चर्चमध्ये होणार घटस्फोट-पुनर्विवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमन कॅथलिक समाजाचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी लग्न आणि घटस्फोटाच्या प्रकरणी नियम शिथिल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जगभरात १.२ अब्ज इतकी रोमन कॅथलिकांची संख्या आहे. आता घटस्फोट घेतलेल्या आणि दुसरे लग्न करणार्‍यांना कार्यक्रमात सहभागी होता येते आणि प्रसाद ग्रहण करण्याचा अधिकार असेल.

जर पती आणि पत्नी या दोघांचीही सहमती असेल तर त्यांच्या घटस्फोटास चर्चची मान्यता असेल. कोणासही चर्चच्या बाहेर जाऊन घटस्फोट घेण्यास आणि दुसरे लग्न करण्याची अडचण आता निर्माण होणार नाही. अनेक प्रमुख व्यक्तींचे आणि पाद्र्यांचे म्हणणे असे की, जगातील बदलत्या परिस्थितीत काही लोकांना घटस्फोट घेण्यास अडचण वाटते, तर काही व्यक्ती घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करतात. या लोकांनी घटस्फोटाची प्रक्रिया आणि घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करण्यावर विचार करावा, असा आग्रह पोपकडे केला होता. पोप यांनी या सूचनांवर विचार करण्यासाठी वकील आणि धर्म अभ्यासकांच्या ११ सदस्यांची समिती बनवली आहे. कॅथलिकांप्रति दयाभावना ठेवावी. स्वेच्छेने घटस्फोट घेतलेल्यांना चर्चच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी, काही सुधारणावादी पाद्र्यांनी असा सल्ला दिला होता.

आतापर्यंतची परंपरा
चर्च आतापर्यंत घटस्फोटास मान्यता देत नव्हते. कारण लग्न हे आयुष्यभरासाठी असते, अशी त्यांची ठाम धारणा होती. घटस्फोट देऊन दुसरे लग्न करणारे पापी जीवन जगत आहेत, म्हणून त्यांना चर्चमध्ये जाण्याचा आणि पवित्र संस्कारात सहभागी होण्याचा तसेच प्रसाद ग्रहण करण्याचा अधिकार नाही. चर्चच्या कडक नियमामुळे घटस्फोट घेणार्‍यांना वकिलांचा सल्ला घ्यावा लागत असे तसेच त्यासाठी जादा पैसे माेजावे लागत असत.

घटस्फाेटामुळेच इंग्लंड वेगळा झाला
सोळाव्या शतकात पोप यांनी किंग हेन्री आठवे यांना कॅथरिनशी घटस्फोट घेण्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळेच इंग्लंडने रोमशी आपले सर्व संबंध तोडले होते आणि वेगळ्या चर्च आॅफ इंग्लंडची स्थापना केली होती. तेव्हा ब्रिटनचे राजे यांनाच आस्थाचे रक्षक म्हणून घोषित करण्यात आले होते. नंतरच्या शतकात जगात सर्वसामान्य कॅथलिक लोकांसाठी घटस्फोटाची प्रक्रिया खूप अवघड आणि महागडी होती. व्हॅटिकन अशा घटस्फाेटांना आणि दुसर्‍या लग्नास परवानगी देत नाही.