आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधी राहाणीसाठी प्रसिद्ध पोप फ्रांसिस यांनी सफर केल्याने चर्चेत आली Fiat 500L

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉश्गिंटन - अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रांसिस यांनी काळ्या रंगाची Fiat 500L कारने प्रवास केला, त्यानंतर या कारचे नशिब फळफळले आहे. संपूर्ण अमेरिकेत या कारविषयी चर्चा सुरु आहे. एका वेबसाइटनूसार या कारच्या सर्चमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कारविषयी चर्चा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पोप फ्रांसिस हे ख्रिश्चन धर्माचे सर्वोत मोठे धर्मगुरु आहेत. ते त्यांच्या साधी राहाणी या विचारांसाठी परिचीत आहेत. त्यांनी निवडलेली Fiat 500L ही कार खचितच त्यांच्या प्रतिष्ठेनूसार नाही, मात्र ही कार सर्वसाधारण आहे हे यामुळे अधोरेखित झाले आहे.
फिएटचे जनरल मॅनेजर मार्क काऊडिन यांनी मान्य केले आहे, की पोप यांनी कारमध्ये पाऊल ठेवल्यानंतर या कारविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यासाठी त्यांनी पोप यांना धन्यवाद दिले आहे. मार्क म्हणाले, 'ही आमच्या कारची जाहिरातच झाली आहे आणि यासाठी आम्हाला पैसेही मोजावे लागले नाही.' फिएट क्रिसलरचे ब्रँड मॅनेजर कॅथी फिन यांनी सांगितले, की कस्टमर्सचे कारविषयी विचारणा करणारे फोन कॉल्स वाढले आहेत. त्यांना जाणून घ्यायचे आहे की या कारचे फिचर्स काय आहेत आणि कोणकोणते मॉडेल उपलब्ध आहे.
फिएटला फायदा कसा
>> फिएटने दोन वर्षांपूर्वी Fiat 500 लॉन्च केली होती. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न समाधानकारक नाही. या वर्षातील आठ महिन्यात फक्त 28421 कारची विक्री झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 12% घट आहे.
>> गेल्या वर्षी फिएटने अमेरिकेत पाच दरवाजांची मोठ्या साइजमध्ये हॅचबॅक 500L लॉन्च केली होती. समीक्षकांनी इटली आणि अमेरिकन तंत्रज्ञानाचा हे सर्वात खराब कॉम्बिनेशन असल्याचे म्हटले होते. या वर्षी ऑगस्टपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत या कारच्या विक्रीत 19% घसरण झाली आहे.
>> तज्ज्ञांचे मत आहे की अमेरिकन लोकांपर्यंत फिएट ब्रँड अजून व्यवस्थित पोहोचलेले नाही. त्यांच्यासाठी अजूनही हा नवखा ब्रँड आहे.
पोपने हीच कार का निवडली
>> इटलीमध्ये या कारची आरंभीची किंमत आहे 19935 डॉलर (साधारण 12 लाख रुपयांच्या आसपास). पोपच्या सामाजिक प्रभावाच्या दृष्टीने ही कार फारच स्वस्त आहे.
>> पोपने एखाद्या महागड्या आणि सुरक्षित वाहनाएवजी एक सर्वसाधारण कार निवडली. पोप हे साधी राहाणीवर विश्वास असणारे व्यक्तीमतत्व आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसी ही कार आहे.
>> पोपचा ही कार निवडण्याचा उद्देश ते आजही साधेपणाने जीवन जगतात. हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा असू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
कारचे वैशिष्ट्य
कारमध्ये चार सिलिंडर, 1.4 लिटर टर्बो इंजिन, 6 स्पिड ऑटोमॅडिक ट्रान्समिशन, ऑप्शनल 17 इंचीचे व्हिल्स, बॅकअपर रिव्हर्सिंग कॅमेरा.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पोपची Fiat 500L ची सफर