आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pope John Paul Second\'s Love Letters Disclose In BBC Documentary

PTOTOS: पोप पॉल यांची प्रेमपत्रे उघड, BBC च्या डॉक्युमेंटरीत माहिती आली समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅथाॅलिक ख्रिश्चनांचे दिवंगत धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय आणि एना-टेरेसा टाइमीनिका यांचा फोटो. - Divya Marathi
कॅथाॅलिक ख्रिश्चनांचे दिवंगत धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय आणि एना-टेरेसा टाइमीनिका यांचा फोटो.
लंडन - कॅथाॅलिक ख्रिश्चनांचे दिवंगत धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांचे एका विवाहित महिलेशी जवळपास ३० वर्षांहून जास्त काळापर्यंत गुप्त संबंध होते. बीबीसीने शेकडो जुनी व प्रसिद्ध न झालेली प्रेमपत्रे, छायाचित्रांच्या आधारे माहितीपट तयार केला आहे. हा माहितीपट सोमवारी प्रसारित करण्यात आला.

बीबीसीनुसार, पाेलिश वंशाची महिला अमेरिकी नागरिक होती. तिचे नाव एना-टेरेसा टाइमीनिका असे होते. एना आणि पोप जॉन पॉल द्वितीय यांची ओळख १९७३ मध्ये झाली होती. तेव्हा जॉन पॉल द्वितीय पोप झाले नव्हते. तोपर्यंत ते पोलंडच्या क्रॅकोमध्ये कार्डिनल कॅरोल वाेयतेलामध्ये होते.
एना आणि पोप यांच्यातील पत्रे सर्वसामान्यांच्या पोहोचबाहेर पोलंडच्या नॅशनल लायब्ररीमध्ये ठेवली होती. या पत्रांच्या माध्यमांतून पोप जॉन पॉल द्वितीय यांच्या आयुष्यातील अपरिचित पैलू पहिल्यांदाच समोर आला आहे. असे असले तरी पोप यांचे या महिलेसोबत शारीरिक संबंध होते, याचा पुरावा मिळाला नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, दिवंगत धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय आणि एना-टेरेसा टाइमीनिका यांचे खासगी फोटो....