आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेजवर अशा कपड्यांमध्ये आली पॉपस्टार, पोलिसांत तक्रार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - इजिप्तमध्ये एका महिला पॉपस्टार विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिची चूक एवढीच की ती स्टेजवर पाश्चात्य कपडे घालून आली होती. स्टेजवर परफॉर्म करताना तिने ब्लू हॉटपॅन्ट, व्हाईट टी-शर्ट आणि गुडघ्यांपर्यंतचा सिलव्हर बूट घातला होता. हा ड्रेस अश्लील असल्याची तक्रार तिच्याविरुद्ध दाखल करण्यात आली आहे. हाएफा वहबे असे तिचे नाव असून तिचा शो आयोजित करणाऱ्यांवर सुद्धा आरोप दाखल करण्यात आले आहेत.

> मूळची लेबनानची असलेली हाएफा मिडल-ईस्टमध्ये एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने गेल्या रआठवड्यात अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ कॅरो येथे परफॉर्म केले. 
> हाएफाने सांगितल्याप्रमामे, तिने या शोमध्ये हॉट पॅन्ट (शॉर्ट) घातला होता. याच शोमध्ये आलेल्या एका महिला पत्रकाराला तिचे शॉर्ट्स आवडले नाही. 
> तिने हाएफा विरोधात टूरिज्म पोलिसांकडे अश्लीलतेची तक्रार दाखल केली आहे. एवढेच नव्हे, तर तिच्यावर देशात बंदी लावण्याची मागणी केली. यावर वेळीच कारवाई करून पोलिसांनी हाएफा आणि तिच्या आयोजकांना नोटीस देखील बजावली आहे. 
> पॉपस्टार हाएफाने आपल्या विरोधात केसचे ऐकताच एक ट्वीट करून आश्चर्य व्यक्त केला. तिच्या विरोधात अश्लीलतेचा खटला दाखल करणारी एक महिलाच होती, हे कळाल्यानंतर आपल्याला धक्का बसला असे तिने सांगितले आहे. 
> आपल्या ड्रेसमध्ये काहीच अश्लील नव्हते. सामान्य कपड्यांमध्ये सुद्धा लोकांना अश्लीलता दिसत असून तो आपल्याला मुद्दाम लक्ष्य करत आहेत असेही तिने स्पष्ट केले. 
> पोलिसांनी नोटीस बजावली तरीही अद्याप पुढील कारवाई केली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, तिला देशात प्रतिबंध लावणार नाही. हाएफा आणि तिच्या व्यवस्थापकांना समज दिली जाईल. 
> इजिप्तमध्ये महिलांच्या अधिकारांविषयी जागरुकता नाही. तेथील प्रसिद्ध वकील नबीह अल-वासाह यांनी हाएफावर वादग्रस्त विधान केले होते. जीन्स आणि शॉर्ट्स घालणाऱ्या महिला बलात्कार आणि सेक्शुअल हरॅसमेंटच्या लायकीच्या आहेत अशा महिलांवर बलात्कार करणे पुरुषांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे त्यांनी म्हटले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हाएफाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...