आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्तुगाल वणवा : पाण्याच्या टाकीत बसून वाचवले प्राण, नव्वदीतील आईवडिलांसाठी महिलेची धडपड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिस्बन - पोर्तुगालमध्ये पेटलेल्या वणव्याने काही कळायच्या आतच अनेकांचे प्राण घेतले पण काहींनी या संकटावर धैर्याने आणि चातुर्याने मात केल्याचे समोर येत आहे. चहुकडे आग लागलेली असताना त्यातून पळ काढणे शक्य नसल्याचे पाहून १२  जण पाण्याच्या टाकीत जाऊन बसले. तब्बल ६ तास ते पाण्याच्या टाकीत होते. विशेष म्हणजे त्यात ९५ वर्षीय दिव्यांग महिलेचाही समावेश आहे. ६ तासांनंतर बचाव पथकाने त्यांना टाकीतून बाहेर काढले.
 
मध्य पोर्तुगालमध्ये पेटलेल्या या भीषण वणव्यातून वाचण्यासाठी काही लोक कारमध्ये बसून जात होते पण वणव्याने त्यांनी आपल्या कवेत घेतले. जळालेल्या कारमधून आतार्यंत ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शिवाय, १७ जण धुरामुळे गुदमरून प्राणास मुकले. या वणव्यात आयसी ८ हा महामार्ग सर्वाधिक प्रभावित झाला. याच महामार्गाच्या किनाऱ्यावर नौदेरिन्होच्या लोकांना पाण्याच्या टाकीत बसण्याचा सल्ला देऊन मारिया दो शियू सिल्व्हा ही महिला नायिका बनली आहे. तिच्या सल्ल्यामुळेच १२ जण त्यांचे प्राण वाचवू शकले. 
 
आईला वाचवण्यासाठी योजना
मारियाने तिच्या ९५ वर्षीय आईला वाचवण्यासाठी आखलेल्या योजनेविषयी ती सांगते, कारमध्ये बसून पळ काढत आपला जीव वाचवू असे पतीने मला सांगितले. पण, माझी दिव्यांग आई कारमध्ये बसू शकत नव्हती. आई तिला तिथेच सोडून निघून जाण्यास सांगत होती. मात्र, मी तसे करू शकत नव्हते. अखेर मी माझ्या मुलाच्या मदतीने आई आणि ८१ वर्षीय वडीलास पाण्याच्या टाकीपर्यंत कसेतरी घेऊन गेले आणि त्यांचे प्राण वाचवले.
 
युरोपीय संघाकडून शोक
या घटनेवर युरोपीय संघाकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. युरोपीय संघाचे आयोग प्रमुख जीन-क्लाउडे जंकर यांनी ट्विट करून म्हटले की, “पोर्तुगालमधील पीडितांबद्दल मला सहानुभूती असून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाचे मला कौतुक वाटते. युरोपीय संघाचे नागरी सुरक्षा विभाग या प्रकरणी सक्रिय झाले असून आम्ही सर्वतोपरी मदत करू. राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो यांनी लिरिया भागाचा दौरा करून पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ते म्हणाले, संपूर्ण देशवासीयांकडून मी पीडितांच्या दु:खात सहभागी आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...