आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियाच्या पवित्र्याने जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, अण्वस्त्रे-एअरक्राफ्ट तैनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- सिरीयात सध्या कोण कोणाविरुद्ध लढत आहे याबाबत प्रचंड गोंधळ आहे. पण यावरुन सुपरपॉवर अमेरिका आणि 80 च्या दशकातील सुपरपॉवर रशिया यांच्यात संघर्षाचे वातावरण तयार झाले आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि सैन्य तयारीने जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. विदेशात असलेल्या कुटुंबीयांना रशियात परत बोलविण्याचे आदेश पुतीन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच सिमेवर विध्वंसक मिसाईल्स तैनात केल्याने तणाव वाढला आहे.
ब्लादिमीर पुतीन आक्रामक स्वभावाचे आहेत. राजकीय किरकिर्द सुरु होण्यापूर्वी ते रशियाच्या लष्करात होते. रशियाने काल अचानक आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल्सची चाचणी घेतली. रशियाच्या वायव्य भागातील पारंपरिक तळांवरुनही मिसाईलची चाचणी घेण्यात आल्याचा रशियाच्या मीडियाने दावा केला आहे.
रशियाच्या पवित्र्याने जगभरात खळबळ उडाली आहे. रशियाच्या लष्करी हालचालींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया प्रचंड आक्रामक देश आहे. त्यांनी एकदा घेतलेला निर्णय मागे घेतला जात नाही. तसेच आता रशियाचे अध्यक्षही तेवढेच आक्रामक असल्याने धोका वाढला आहे. रशियाने पोलंड आणि लिथुवानिया यांच्याशी निगडित असलेल्या सिमेवर अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या मिसाईल तैनात केल्या आहेत. रशियाचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय शांती कराराचे उल्लंघन समजले जात आहे.
सिरीया संकटानंतर पुतीन आता समझौता करण्याच्या मुडमध्ये नाहीत. रशियाच्या दोन विमानवाहू युद्धनौका भूमध्य सागराच्या दिशेने जात आहेत. या दरम्यान अमेरिकेच्या नेतृत्वात पश्चिमेकडील देशांच्या एका समुहाने सिरीयातील रशियाच्या भूमिकेवर प्रचंड टीका केली. पण याने पुतीन यांना कोणताही फरक पडलेला नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... रशियाने कशी केली आहे युद्धाची तयारी... पुतीन यांचे सहकारी अमेरिकेला म्हणाले, हिलरी क्लिंटन युद्धखोर... जागतीक युद्ध भडकणार....
बातम्या आणखी आहेत...