आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत अशी करतात... पित्याने दिली शिकवण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - ही पोस्ट फादर्स डेला एका मुलाने फेसबुकवर टाकली. वडील त्याला बचत व गुंतवणुकीचे कसे धडे देतात, हे त्याने सांगितले. वडीलाचे छायाचित्रही पोस्ट केले. याला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. ८० हजारहून अधिक वेळा ते शेअर झाले आहे. यावरील बहुतेक कॉमेंट‌्स वडिलांची वाहवा करणाऱ्या आहेत. यामुळे व्यवहारात मुले जबाबदारीने वागतील, असे लोकांना वाटते. अनेकांनी आपण पिता झाल्यावर हीच पद्धत स्वीकारू, असेही म्हटले. अशा प्रकारे मुलांना बचतीचे धडे खरे तर घरातूनच मिळतात. गेल्या वर्षी एका सर्वेक्षणात ३६ टक्के गुंतवणूकदारांनी आई-वडिलांकडूनच हे धडे घेतल्याचे सांगितले आहे.

वडिलांविषयी मुलाची अशी फेसबुक पोस्ट
वडील मला आठवड्याला एक डॉलर देतात. माझ्याकडे खर्च करणे, बचत, दान किंवा गुंतवणूक असे चार पर्याय असत. मी हे डॉलर गुंतवणूक म्हणून ठेवले तर वडिल मला महिनाअखेरीस दोन पेनी अधिक देतात. खर्चाचा पर्याय मी आतापर्यंत फक्त दोन वेळा निवडला. गुंतवणुकीत माझे १० डॉलरहून अधिक जमा आहेत. खरे तर यात खूप पैसे जमले होते. मात्र, त्यातील काही काढून मी डोनेशन सेक्शनमध्ये टाकले. या पैशातून मी गरीब मुलांसाठी अन्न खरेदी करतो.

आणखी एक पद्धत : आवडती वस्तू तयार करते त्या कंपनीचे शेअर घ्या
एका दापत्याला तीन अपत्ये आहेत. पित्याने त्यांची बचत खाती उघडली. वर्षभरानंतर ०.१७ % परतावा मिळाला. पित्याने मुलास आवडत्या वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांचे शेअर घेण्यास सांगितले. कॉम्प्युटर आवडते म्हणून त्याने अॅपलचे शेअर्स घेतले, मुलीस डिस्नेचे चित्रपट आवडतात म्हणून तिने डिस्नेचे तर धाकटीने हनीवेल या मधाच्या कंपनीचे शेअर खरेदी केले. डिस्ने शेअर्सनी १४० %, अॅपलच्या शेअर्सनी ८५ % तर हनीवेलच्या शेअर्सनी ७० % रिटर्न दिले.
बातम्या आणखी आहेत...