आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक CEOची पोस्ट- आयुष्यात नाती सर्वात महत्त्वाची, काही अडचणीत आणतात, तर काही बाहेर काढतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका (कॅलिफाेनिर्या) - फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग सध्या अमेरिकेच्या विविध भागात  फिरत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी हे आव्हान स्वीकारले होते. फेसबुक फक्त माहिती पुरवणारे साधन बनू नये तर ओळखीच्या लोकांसोबतच मार्गदर्शकांशीही सांगड घालून देणारे माध्यम बनावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘आयुष्यात नाती खूप महत्त्वाची असतात. अडचणीतून बाहेर काढणे किंवा चांगल्या संधी देणे अशा गोष्टींत नात्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.’ समस्येवर नाती कशी परिणामकारक ठरतात हेसुद्धा तीन कथानकांद्वारा सांगितले आहे.    

पहिली गोष्ट : ओहियोमध्ये  व्यसन सोडणाऱ्या लोकांना भेटलो. ते म्हणाले, व्यसनांपासून दूर जाण्यावर पहिला उपाय डिटॉक्स तर दुसरा नवीन मित्र बनवणे आहे. जुन्या मित्रांना भेटलो तर पुन्हा व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता असते. नवीन नाती जोडणे हा यावर प्रेरक उपाय ठरू शकतो. या लोकांना ज्ञात होते की, ड्रग्जचे व्यसन वाईट असते. पण, त्यांच्या आसपासच्या लोकांचा प्रभाव त्यांच्यापेक्षा वरचढ होता. ही केवळ एखादे ज्ञान असण्यापुरती गोष्ट नाही. चांगल्या वाटचालीसाठी चांगली नाती जोडण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी. फक्त माहितीने भागत नाही.    
 
दुसरी गोष्ट : इंडियानाच्या बालसुधारगृहात काही मुले अशी भेटली ज्यांनी खून, लूटमारसारखे गुन्हे केले होते. तर, काहींनी फक्त शाळेत धिंगाणा घातला होता. चिंता हीच आहे की, शिक्षा पूर्ण होऊनही ही मुले गुन्हेगार म्हणूनच बाहेर पडतील. सुधारणात्मक तंत्र, एक स्वनिर्मित मजबूत निगेटिव्ह सोशल नेटवर्क बनत आहे. गुन्हा वाईट असतो हे मुलांना माहीत आहे. पण, आसपासची परिस्थिती त्यावर वरचढ ठरते. त्यामुळे अशा बालकांची मदत करायची असेल तर त्यांच्या आदर्शातून सकारात्मक संबंध बनवायला शिकवायला हवे.   
 
तिसरी गोष्ट : दक्षिण आफ्रिकेच्या उपेक्षित भागात फिरत असताना मला आढळले की, संधीच्या शोधात लोक त्यांची गावे सोडून जात आहेत. आर्थिक गतिशीलतेचे हे उत्तम उदाहरण आहे. पण, काही लोक त्यांची जागा सोडत नाहीत. कारण, कुठे जाण्याची अनिच्छाही आर्थिक असमानतेचे मोठे कारण असते.   

शेवटी झुकेरबर्ग लिहितात, “आपण लोकांची मदत केल्यास समाजावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यांना नव्या नात्यांचे महत्व समजल्यास हे मोठे योगदान ठरू शकते. आपण इतरांच्या अनुभवांमधून नक्कीच प्रेरणा घ्याल, अशी मला अपेक्षा आहे. अशाप्रकारच्या प्रेरणादायी गोष्टी मी आपल्याकडून ऐकण्यासाठी आतुर आहे.’
 
बातम्या आणखी आहेत...