जकार्ता - इंडोनेशियाचा पपुआ परिसर आज (मंगळवार) सकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी भूकंपाने हारदला. रिक्टर प्रमाणे त्याची तीव्रता 7.0 एवढी होती. यूएस जियोलॉजिकल सर्वे नुसार, सकाळी 6 बजकर 41 मिनिटांनी राजधानी जयापुरापासून 250 किलोमीटर दूर हा भूकंप झाला. इंडोनेशियाच्या नॅशनल डिजास्टर एजेंसीने सांगितले, 52 किलोमीटर खोल या भूकंपाचे केंद्र असून, काय काय नुकसान झाले याची माहिती नाही. दरम्यान, यामुळे सुनामीचे संकट येऊ शकते, असा इशाराही नागरिकांना देण्यात आला आहे.
डिजास्टर एजेंसीचे प्रवक्ता सुतोपो पुर्वो नुगरोहो यांनी सांगितले, चार सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर आले. यामुळे शहरातील भागात नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. पण, दुर्गम भागातील माहिती अजून मिळाली नाही.