आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचंड होणार पंतप्रधान, नेपाळमध्ये प्रचंड - मधेशी यांच्यात ११ सूत्री करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळमधील माओवाद्यांचे प्रमुख प्रचंड यांनी मंगळवारी नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. बुधवारी त्यांची या पदासाठी निवड होऊ शकते, असा अंदाज आहे. दरम्यान प्रचंड आणि आंदोलनकर्त्या मधेशींच्या पक्षामध्ये ११ सूत्री समझोता झाला असून मधेशींनी प्रचंड यांना पाठिंबा देऊ केला आहे. करारानुसार मधेशींच्या आंदोलनात मारल्या गेलेल्यांना शहिदांचा दर्जा देणे, जखमींना भरपाई देणे यासह २६ मागण्यांवर राजकीय सर्वसहमतीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.

सभागृहाचे सभापती ओन्सारी घार्ती यांनी सभागृहाच्या ५९६ सदस्यांची बुधवारी बैठक बोलावली आहे. ही संसद (प्रतिनिधी सभा) नेपाळचा नवा पंतप्रधान निवडेल. प्रचंड यांची निवड ही जवळपास निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे घातपात,तोडफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळून लोकशाहीचे बाळसे धरू पाहत असलेल्या नेपाळच्या अस्थिर राजकारणात स्थैर्य येईल, असे काही जणांकडून मानले जात आहे. के. पी. ओली यांनी या पदाचा राजीनामा यापूर्वीच म्हणजे २४ जुलै रोजी दिला होता. त्यामुळे नेपाळचे राजकारण ढवळून निघाले होते. नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांनीच ६१ वर्षीय वरिष्ठ सीपीएन-माओ ईस्ट केंद्र अध्यक्ष प्रचंड यांचे नाव पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून प्रस्तावित केले.
बातम्या आणखी आहेत...