आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळच्या पंतप्रधानपदी प्रचंड यांची पुन्हा निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - माओवादी नेते आणि नेपाळातील ६१ वर्षीय वरिष्ठ नेते प्रचंड यांची आज नेपाळच्या नव्या पंतप्रधानपदी प्रतिनिधी सभागृहातील प्रतिनिधींनी दुसऱ्यांदा निवड केली. ते नेपाळचे ३९ वे पंतप्रधान असतील. या वेळी प्रचंड यांनी राष्ट्राला आर्थिक विकासाच्या शिखरावर नेऊ, असे आश्वासन दिले. भारतविरोधी अशी त्यांची प्रतिमा आहे. या वेळी त्यांचे एकमेव प्रतिस्पर्धी पुष्पकमल दहल हे होते. या पदावर पोहोचलेले ते एकमेव नेपाळचे कम्युनिस्ट नेते आहेत.
प्रचंड यांना नेपाळच्या घटनेनुसार झालेल्या मतदानात ५९५ पैकी ३६३ सदस्यांची मते पडली, तर विरोधात २१० मतेे गेली. २२ जणांनी मतदानाच भागच घेतला नाही. त्यांना सभागृहातील सर्वात मोठा पक्ष नेपाळी काँग्रेसचा पाठिंबा होता. तसेच त्यांनी मधेशींचादेखील पाठिंबा मिळवला होता.
बातम्या आणखी आहेत...