आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वचनाला जागले; प्रचंड यांनी दिला राजीनामा, शेर बहादूर देउबा स्वीकारतील पंतप्रधानपद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी करारानुसार ९ महिने पूर्ण झाल्यानंतर बुधवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. आता शेर बहादूर देउबा नवे पंतप्रधान असतील. माआेवादी नेता प्रचंड यांनी ३ ऑगस्ट २०१६ रोजी नेपाळी काँग्रेससोबत सामंजस्य वाटाघाटी केल्या होत्या. नवे देउबा सरकार हे देशाचे गेल्या २७ वर्षांतील २५ वे सरकार असेल.  
 
सीपीएन (माआेवादी) चे अध्यक्ष प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेसचे नेता शेर बहादूर देउबा यांना वचन दिले होते की, ९ महिन्यांत ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील. फेब्रुवारी २०१८ मध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये पंतप्रधानपदाविषयी वाटाघाटी झाल्या होत्या. प्रचंड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंतप्रधान पदावर राहतील. त्यानंतर होणाऱ्या दोन निवडणुकांदरम्यान देउबा पंतप्रधानपदी राहतील. नेपाळच्या लाखो मतदारांनी १४ मे रोजी दोन दशकांच्या कालावधीत प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान केले. १९९७ मध्ये माआेवादी आंदोलनात नेपाळमध्ये अंदाजे १६ हजार लोक मारले गेले. त्यानंतर निवडणुका होऊ शकल्या नाहीत. दर पाच वर्षांत निवडणुका होणे अपेक्षित आहे.  

एका दिवसाने राजीनामा टळला  
प्रचंड मंगळवारी संसदेकडे राजीनामा सुपूर्द करणार होते. मात्र, विरोधी पक्षाने दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २२ नवे मतदारसंघ निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ घातला. या नव्या मतदारसंघांना त्यांचा विरोध आहे. बुधवारी संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे प्रचंड यांनी टीव्हीवर २८ मिनिटे राष्ट्राला उद्देशून भाषण केले व त्याच भाषणात त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रपती विद्यादेवी भंडारींकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.

वाटाघाटींचे महत्त्वाचे मुद्दे   
- फेब्रुवारी २०१८च्या संसदीय निवडणुकांपर्यंत आळीपाळीने सरकार चालवण्याचे ठरले होते.  
- स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुकांपर्यंत प्रचंड पंतप्रधानपदी असतील.  
- इतर दोनचे  (प्रांतीय आणि केंद्रीय) देउबा नेतृत्व करतील.  

निवडणुकांवर एक नजर  
- १४ मे रोजी २० वर्षांत प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका झाल्या.  
- १४ जून रोजी पालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार. 
बातम्या आणखी आहेत...