आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranav Mukherjee Says, Pandit Nehrus Message Of Peaceful Coexistence Eternal

शांततामय सहचर हा नेहरूंचा संदेश शाश्वत : प्रणव मुखर्जी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपतींच्या विशेष विमानातून- देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी दिलेला शांततामय सहचर हा संदेश कालातीत आहे. तो आजही लागू होतो. त्यामुळे पहिल्या पंतप्रधानांची शिकवण गैरलागू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

तेल अवीवहून नवी दिल्लीला विमानाने परतताना त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. त्या वेळी त्यांनी एका प्रश्नावर नेहरूंच्या विचारसरणीचे महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न केला. जॉर्डन, पॅलेस्टाइन आणि इस्रायलसारख्या देशांचा सहा दिवसांचा दौरा करून मुखर्जी मायदेशी परतले आहेत. इस्रायलला धर्मावर आधारित सरकार चालवता येणार नाही, असे विधान केले होते. परंतु इस्रायल आणि पाकिस्तान तर धर्मावर आधारित देश आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता मुखर्जी म्हणाले, कोणत्याही सरकारचा कारभार धर्माधारित असू शकत नाही. उदाहरणार्थ -अरब देश. या देशांत इस्लाम मुख्य धर्म आहे, परंतु धर्मावर आधारित कारभार मात्र केला जात नाही.

नेतन्याहूंना भारत भेटीचे निमंत्रण : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिले आहे. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये त्यांची मोदींशी भेट झाली होती. भारत भेटीसाठी ते उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. इस्रायलला भेट देणारे मुखर्जी भारताचे पहिलेच राष्ट्रपती ठरले आहेत. त्याशिवाय राष्ट्राध्यक्ष रेवेन रिव्हलिन यांनाही भारत भेटीचे निमंत्रण देण्यात आले असून ते त्यांनी स्वीकारल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. भारत-इस्रायल यांच्यातील मैत्री आणखी बळकट करण्यासाठी नवीन सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

पाकची २५ वर्षांतच काय धडगत झाली ?
पाकिस्तानची निर्मिती झाली, मात्र अवघ्या २५ वर्षांतच बांगलादेश फुटून बाहेर पडला. हीच गोष्ट मी इस्रायलच्या संसदेसमोर मांडली. धर्मावर आधारित कारभाराचे भवितव्य काय असते हे पाकिस्तानच्या उदाहरणावरून स्पष्ट होते, असे राष्ट्रपतींनी सांगितले.