आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prank Video Of How Wife Crying After Eating Spice And Her Husband Shooting Video

नवऱ्याने काहीतरी खाऊ घालताच बायकोची आरडा ओरड, पाहा Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या एक असा व्हिडीओ काही सोशल साईट्सवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक पत्नी ओरडताना दिसत आहे तर तिचा नवरा त्या अवस्थेतही तिचा व्हिडीओ शूट करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. खरं तर हा एक प्रँक व्हिडीओ (गमतीसाठी तयार केलेला) पण यामध्ये महिलेची ओरडून ओरडून वाइट अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते.एक हजारपट अधिक तिखट खाल्ल्यावर काही वेळ ही महिला अगदी प्राणाच्या आकांताने ओरडत असल्याचे या व्हिडीओमध्ये आहे.

ही महिला एवढी परेशान झाली की तिला या सर्व गोंधळामध्ये कशाचेही भान राहिले नाही. व्हिडीओ पाहून तुम्हालाही त्याची जाणीव होईल. पण हे सर्व सुरू असताना तिचा नवरा मात्र जोरजोरात हसत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तो तिला सारखे कसे वाटले कसे वाटले असे विचारताना दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ शूट करण्याचे कारण मात्र अद्याप देण्यात आलेले नाही. काही सोशल साइट्सवरील माहितीनुसार हा व्हिडीओ बराच जुना आहे. पआतापर्यंत त्याला जवळपास सव्वातीन कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS आणि VIDEO