आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्रपती निवडणूक: विस्कॉन्सिनला फेरमतमोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मोठ्या बदलाची चिन्हे दिसत आहेत. विस्कॉन्सिन राज्याने मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करून फेरमतमोजणीचे आदेश दिले आहेत. ग्रीन पार्टीच्या उमेदवार जिल स्टेन यांच्या तक्रारीवरून हा निर्णय घेण्यात आला.

मिशिगन, पेन्सिल्व्हानिया, विस्कॉन्सिनमध्ये मतदान यंत्रे हॅक झाल्याचा व निवडणुकीत हेराफेरीचा स्टेन यांचा आरोप आहे. या तीन राज्यांत ४६ तर विस्कॉन्सिन राज्यात १० इलेक्टाेरल मते आहेत. हीच मते लोकप्रिय मतांच्या रूपाने ट्रम्प यांच्या पारड्यात पडली आहेत. मात्र, त्यात काही बदल झाल्यास राष्ट्रपतिदाच्या निवडणुकीत पराभूत हिलरी क्लिंटन यांचा विजय होऊ शकतो.

राज्यात पुन्हा एकदा मतमोजणी वेगाने केली जाणार आहे. त्याचा निकाल १० डिसेंबरपर्यंत जाहीर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मतमोजणीची प्रक्रिया १३ डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हायला हवी. १९ डिसेंबरला इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य राष्ट्रपतिपदासाठी मतदान करतील. मात्र ‘या निवडणुकीत कोणतीही गडबड झाली नाही. जनतेचा निर्णय मान्य आहे. अमेरिकी निवडणूक प्रक्रियेत कोणीही घुसखोरी करू शकत नाही. ती हॅक करता येत नाही, असे विद्यमान राष्ट्रपती बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

२२,००० मतांचा फरक :
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय केवळ २२ हजार मतांनी झाला. ट्रम्प यांना ४७.९ टक्के मते, तर हिलरींनी ४६.९ टक्के मते मिळाली. ग्रीन पार्टीच्या स्टेन यांना १.१ टक्के मते मिळाली आहेत. जास्तीच्या मतांच्या आधारे राज्यातील सर्व इलेक्टोरल मते ट्रम्प यांना देण्यात आली. निकाल बदलल्यास ही मते हिलरींच्या बाजूने वळतील.

पूर्वीही झाली होती मतमोजणी?
अमेरिकेत २००० मध्ये फ्लोरिडात डेमोक्रॅट उमेदवार अल गोर व रिपब्लिकन जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यात केवळ ०.००९ टक्क्यांचा फरक होता. त्यामुळे पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात आली. परंतु अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली. बुश यांना ५३७ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. इलेक्टोरल कॉलेजची सर्व मते बुश यांना देण्यात आली.

कोणाला किती मते?
डाेनाल्ड ट्रम्प १४,०४,०००
हिलरी क्लिंटन १३,८१,८२३
बातम्या आणखी आहेत...