आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prejudice Allegation Spotted On Landon High Court Judges

लंडनच्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तींवर पूर्वग्रहदूषित असल्याचा ठपका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटिश एअरवेजमध्ये बेपत्ता झालेल्या आपल्या सामानाबद्दल विचारणा करणे लंडन उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पीटर स्मिथ यांना महागात पडले. त्यांना यासंदर्भातील खटल्यातून बाहेर पडावे लागले आहे.

स्मिथ यांच्या कोर्टात एअरलाइन्सशी संबंधित प्रकरण आले होते. त्यात सुमारे ३० एअरलाइन्सच्या विरोधात हजारो तक्रारी आल्या होत्या. त्यात ब्रिटिश एअरवेजचाही समावेश होता. विशेष म्हणजे स्मिथ यांची बॅग काही दिवसांपूर्वी याच विमान कंपनीकडे विसरली होती. ती बॅग अद्यापही सापडली नाही. त्यावर कंपनीकडून दिलगिरीदेखील व्यक्त करण्यात आलेली नव्हती. सुनावणीच्या वेळी कंपनीचे कर्मचारी आपली बाजू मांडण्यासाठी आले होते. त्या वेळी न्यायमूर्ती स्मिथ म्हणाले, हे प्रकरण तर सुरू आहे; परंतु आधी माझी बॅग सापडली की
नाही? हे सांगा. त्यावर ब्रिटिश एअरवेजने त्यांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी जजच्या विरोधात तक्रार दाखल केली. ब्रिटिश एअरवेज इतर प्रतिस्पर्धी विमान कंपन्यांच्या तुलनेत प्रवासी साहित्य वाहून नेण्यासाठी अधिक शुल्क आकारते, असेही त्यांनी सुनावले. त्यानंतर पीटर स्मिथ अगोदरदेखील निवाड्याबद्दलचे कोडेड मेसेज लिहिण्यावरून वादात राहिले आहेत. ‘दा विंची’ कादंबरीच्या कॉपीराइट प्रकरणातही त्यांनी कोडचा वापर केला होता.

या वेळीदेखील त्यांनी ब्रिटिश एअरवेजला धमकी दिली आणि माझ्या सामानाबद्दल सांगा. तुमच्या मुख्य कार्यकारी अधिका-याला कठघ-यात उभे करू, अशी भाषा वापरली. त्यानंतर स्मिथ यांना सुनावणीतून बाहेर पडावे लागले. सुनावणीच्या वेळी माझ्या बॅगबद्दल जरूर विचारले होते; परंतु पूर्वग्रहातून किंवा पक्षपाती दृष्टिकोनातून सुनावणी नव्हती, असे पीटर स्मिथ म्हणाले. हा खटला नऊ वर्षे सुरू होता. आता नवीन जजची नेमणूक करण्यात आली
आहे.

काय होता दावा?
व्यावसायिक स्पर्धेच्या खटल्यांचा न्यायमूर्ती स्मिथ यांना काहीही अनुभव नाही. त्यामुळे त्यांना खटल्यातून बाहेर ठेवावे, असा तर्क ब्रिटिश एअरवेजच्या वकिलांनी मांडला होता.