आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांचे अखेरचे भाषण, म्‍हणाले - दहशतवादासाठी PAK सारखे देश नंदनवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात शेवटचे भाषण दिले. त्‍यांचा कार्यकाळ या वर्षी नोव्‍हेंबर महिन्‍यात संपत आहे. त्‍यानंतर अमेरिकेत राष्‍ट्राध्‍यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
ओबामा यांनी अमेरिकी सैन्याविषयी काय म्‍हटले...
सध्‍याचे सैन्‍यबळ हे अमेरिकेच्‍या इतिहासातील सर्वाधिक शक्‍तीशाली असल्‍याचे ओबामा यावेळी म्‍हणाले. अमेरिका हा जगातील सर्वात शक्‍तीशाली देश असल्‍याचे ते म्‍हणाले.
भाषणात आणखी काय म्‍हणाले ओबामा?
1. दहशतवाद

- दहशतवादाविरोधात कारवाईसंदर्भात बोलताना ते म्‍हणाले, '' इतर दहशतवाद्यांना जी शिक्षा मिळाली तीच इसिसलाही मिळेल.''
- ''जर कुणाला अमेरिकेच्‍या कमिटमेंटवर शंका असेल, तर त्‍यांनी ओसामा बिन लादेन यांना विचारावे.''
- ''इसिसचे धोरण आणि अल कायदाच्‍या धोक्‍यांवर लक्ष असायला हवे. इसिसशिवायही जगात मिडल इस्‍ट, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मध्‍य अमेरिका, आफ्रिका आणि आशियासारख्‍या काही भागात येणा-या दशकात दहशतवाद्यांच्‍या हालचाली कायम राहणार आहेत. हे देश दहशतवादी नेटवर्कसाठी नंदनवन आहेत''
2. गन लॉ
- ओबामा म्‍हणाले, "मी या वर्षी, इमिग्रेशन, गन आणि हिंसा, समान वेतन, सुट्या, किमान वेतन अशा समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे."
- "मला आशा आहे की, या वर्षी आपण क्रिमिनल जस्टिस रिफॉर्मवर काम करू शकू."
3. स्थलांतर आणि उद्योजक
-
"बोस्टनपासुन ऑस्टिन आणि सिलिकॉन व्हॅलीपर्यंत अमेरिकेत स्‍थलांतरीत, उद्योजक आहे."
- "स्पिरिट ऑफ डिस्कव्‍हरी आपल्‍या डीएनएमध्‍येच आहे. अमेरिकेत थॉमस एडिसन, राईट ब्रदर्स आणि जॉर्ज वॉशिंग्‍टन यांचे उदाहरणं आहेत.
- "छोटे व्‍यवसाय आणि कामकारांना न्‍याय द्यावा लागेल. त्‍याचा आवाज दबू नये."

4. खासगी क्षेत्र
-
ओबामा म्‍हणाले " मला विश्‍वास आहे की, विशाल खासगी क्षेत्र अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी रक्‍तवाहिनीसारखे आहे."
- "अमेरिकेने सर्व लोकांना रोजगारासाठी संधी उपलब्‍ध करून दिली. सर्व पक्षांनी एकत्र काम करून रोजगार सुरक्षेसाठी काम करावे."

5. ओबामाकेअर
- ओबामा म्‍हणाले, "17.6 दशलक्ष अमेरिकन नागरिकांनी ओबामाकेअर अंतर्गत आरोग्‍य सुविधेचा लाभ घेतला आहे."
- "सामाजिक आणि आरोग्‍याची सुरक्षा आपल्‍यासाठी महत्‍त्वाची बाब आहे. त्‍याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही."
6. शिक्षण
- "आम्‍हाला सर्व अमेरिकेत स्‍वस्‍तात शिक्षणाच्‍या सोयी उपलब्‍ध करून द्यायच्‍या आहेत.
- "आपण विद्यार्थी आणि शिक्षकांचे महत्‍त्व ओळखून, चांगल्‍या शिक्षकांची नियुक्‍ती करायला हवी."
- "अमेरिकेतील सर्वांना दर्जेदार शिक्षण आणि चांगले प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्‍यामुळे त्‍यांना चांगला रोजगार मिळेल."
7. सौर ऊर्जा
- ओबामा म्‍हणाले, "अमेरिकेत ऍरिझोना ते न्यूयॉर्कपर्यंत सौर ऊर्जा वापरली जात असल्‍याने, दरवर्षी कोट्यावधी डॉलरची बचत झाली"
- "सात वर्षांपूर्वी आम्‍ही सौर उर्जेसाठी ऐतिहासिक गुंतवणूक केली."
- "आम्‍ही भविष्‍यातील इंधनावर लक्ष केंद्रित करू इच्‍छितो."
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...