आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिल, मेलिंडा गेट्स यांना सर्वोच्च सन्मान प्रदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत बिल आणि मेलिंडा गेट्ससह २१ जणांना मंगळवारी प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा सर्वोच्च नागरिक सन्मान देण्यात आला. अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका भव्य समारंभात सर्वांना सन्मानित केले. आज मी जो काही आहे तो होण्यासाठी या लोकांनी मला मदत केली, अशी टिप्पणी ओबामांनी या २१ जणांबाबत केली.
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांना परोपकारी कामांबद्दल प्रतिष्ठित मेडलने सन्मानित करण्यात आले. ओबामा म्हणाले की, गेट्स फाउंडेशनने गेल्या दोन दशकांपासून उत्कृष्ट आरोग्य सुविधा देऊन लाखो-कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्याचे काम केले आहे. पर्यावरण बदल, मुलांचे शिक्षण, स्वच्छ पाणी यांसारख्या अनेक गोष्टींसाठीही गेट्स यांनी जे काम केले आहे आणि जेवढी रक्कम दिली आहे तेवढे कोणीच केले नाही.

गेट्स यांच्याव्यतिरिक्त अभिनेता टॉम हँक्स, रॉबर्ट डी नीरो, रॉबर्ट रेडफोर्ड, माजी बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डन आणि करीम अब्दुल-जब्बार यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.
‘अमेझिंग ग्रेस’ आणि ‘द फर्स्ट लेडी ऑफ सॉफ्टवेअर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रिअर अॅडमिरल ग्रेस हॉपर यांना संगणक आणि प्रोग्रामिंग डेव्हलपमेंटमधील त्यांच्या योगदानाबद्दल हा सन्मान मिळाला. ओबामा म्हणाले की, हा सन्मान मिळवणाऱ्या असामान्य लोकांचा हा गट अमेरिकेला सर्वात महान देशाच्या रूपात दर्शवत आहे.
बातम्या आणखी आहेत...