आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजहून परतणारे मालदीवचे प्रेसिडेंट यामीन यांच्यावर हल्ला, पत्नी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माले - हज यात्रेहून परतणारे मालदीवचे प्रेसिडेंट अब्दुल्ला यामीन यांच्यावर सोमवारी हल्ला करण्यात आला. यामीन या हल्ल्यातून बाल बाल बचावले. मात्र यामीन यांच्या पत्नी फातमा इब्राहीम या हल्ल्यात जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामीन यांचे बॉडीगार्डसही जखमी झाल्याचे वृत्त आहे.
यामीन सौदी अरबहून हज यात्रा केल्यांनंतर एका आयलंडवर उतरले. त्यानंतर एका स्पीडबोटमधून राजधानी मालेला परतत असताना त्यांच्या बोटमध्ये ब्लास्ट झाला आणि काचेचे तुकडे दूर दूरपर्यंत फेकले गेले. त्यानंतर पोलिस आणि गुप्तचर संस्थांनी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला आहे.

मीडियाशी करणार होचे चर्चा
प्रेसिडेंट बोटवरच पत्रकारांशीही चर्चा करणार होते, असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी काही पत्रकारदेखिल बोटवर होते. ही प्रेसिडेंट यामीन यांची ऑफिशियल बोट होती. प्रेसिडेंट ऑफिसमधील मिनिस्टर हुसेन शरीफ यांनी सांगितले की, ब्लास्टचे कारण काय होते, हे आताच सांगता येणार नाही. पोलिसा आणि स्पेशल युनिटचा तपास सुरू आहे आणि त्यानंतरच काहीही सांगता येईल, असेही त्याने सांगितले.

वादग्रस्त व्यक्तीमत्त्व
यामीन यांना देश विदेशामध्ये वादग्रस्त व्यक्ती म्हणूनच ओळखले जाते. ते 2013 मध्ये राष्ट्रपती बनले होते. पण या निवडणुकीवर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यांनी माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांना पराभूत करून निवडणूक जिंकली होती. नशीद यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगामध्ये डांबण्यात आले होते. पण नंतर आंतरराष्ट्रीय दबाबामुळे त्यांना सोडावे लागले. हॉलीवुड अॅक्टर जॉर्ज क्लूनीयांच्या पत्नी आणि ह्युमन राइट्स अॅक्टीव्हीस्ट अमाल क्लूनीने मालदीववर प्रतिबंध लावण्याची मागणी केली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS