आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्राध्यक्षा पार्क ग्यून यांना नाटक थांबवा, तत्काळ राजीनामा देण्याची दक्षिण कोरियातील विरोधकांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल : दक्षिण कोरियामधील विरोधकांचे आंदोलन अधिक उग्र होत असताना पाहून राष्ट्राध्यक्षा पार्क ग्यून यांनी राजीनामा देण्यास तयार असल्याचे जाहीर केले. संसदेने शांततेने सत्ता परिवर्तनाची प्रक्रिया करावी, असा सल्लाही पार्क यांनी दिला. त्यांनी जनतेची त्रिवार माफी मागितली. राष्ट्राध्यक्षांची ही नाटकबाजी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. संसदेला सल्ला देणे बंद करा व पदाचा राजीनामा द्या, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
पार्क या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. १९६० नंतर राजीनामा देणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष ठरल्या. त्या वेळी प्रचंड विरोधानंतर पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमॅनरी यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी नंतर हवाईला पलायन केले. त्यांच्यानंतर पार्क ग्यून यांचे वडील पार्क चुंग यांनी हुकूमशाही शासनप्रणाली राबवली. १९७९ मध्ये त्यांच्या खुनानंतर त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले होते.
मंगळवारी राष्ट्राध्यक्ष ग्यून यांनी टीव्हीवर जनतेला संबोधित केले. मी आपले भविष्य संसदेच्या हवाली केले आहे. यात माझा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ कमी करण्याचा अधिकारही त्यांना आहे. जर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने मिळून सरकारी कामकाजाविषयीची संदिग्धता दूर केली तर सत्तेचे सुरक्षित हस्तांतरण करता येईल. मी त्यानंतर राजीनामा देईन, असे त्या या भाषणात म्हणाल्या.
दरम्यान, विरोधी पक्षाने त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची तयारी केली आहे. यावर शुक्रवारी चर्चा होईल. त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या मित्रपक्षांनी म्हटले आहे की, त्यांनी सम्मानपूर्वक राजीनामा देणेच योग्य.
प्रकरण काय आहे
- पार्क ग्यून यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. आपल्या निकटवर्तीयांना याचा लाभ त्यांनी दिला. यातील काहींना अटक करण्यात आली. या घोटाळ्यांमध्ये राष्ट्राध्यक्षही सहभागी असल्याचे पुरावे असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. मात्र, त्या पदावर असल्याने कारवाईत अडथळे येत आहेत. एक महिन्यापासून त्यांच्याविरुद्ध आंदोलने सुरू आहेत
- वडील हुकूमशहा : राष्ट्राध्यक्ष पार्क ग्यून हे यांचे वडील पार्क चुंग दक्षिण कोरियाचे १८ वर्षे हुकूमशहा राहिले आहेत. पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमॅन री यांच्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. १९६० मध्ये त्यांना देश सोडून पलायन करावे लागले. त्यानंतर लोकशाही सरकार स्थापन झाले. मात्र, जुलै १९६१ मध्ये सैन्याने सत्तासूत्रे हाती घेतली. पार्क चुंग यांनी मार्शल लॉ लागू केला. १९६३ मध्ये ते राष्ट्राध्यक्षपदी आले.
फर्स्ट लेडीपासून ते राष्ट्राध्यक्ष पदापर्यंतची वाटचाल
पार्क ग्यून हे यांनी विवाह केला नाही. त्यांच्या आईची एका उत्तर कोरियन व्यक्तीने हत्या केली. त्याच दरम्यान १५ ऑगस्ट १९७४ ते १९७९ पर्यंत आईच्या जागी मुलगी दक्षिण कोरियाची फर्स्ट लेडी होती. १९८७ मध्ये त्यांनी तैवानच्या चायनीज विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. खासदार व नंतर पार्टी अध्यक्षपद स्वीकारले. २५ फेब्रुवारी २०१३ रोजी राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. चिनी, इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांच्या त्या जाणकार आहेत.
बातम्या आणखी आहेत...