आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या सैनिकाने 3 महिलांवर अत्याचार केल्यास दोष घेईन, फिलिपाइन्सचे अध्यक्ष दुतेर्तेंचा विनोद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनिला - फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांना अत्याचार म्हणजे विनोद वाटतो. सैनिकांना संबोधित करताना ते म्हणाले की, एखाद्या सैनिकाने तीन महिलांवर अत्याचार केला तर मी त्याचा दोष माझ्या माथ्यावर घेईन. मात्र, दुसऱ्याच क्षणी ते म्हणाले की, कोणाशीही वाईट वागणूक झाली तर मी ती खपवून घेणार नाही. मिंडानाओ या दक्षिणेकडील प्रांतात हिंसाचारानंतर मार्शल लॉ लागू केल्यानंतर सैनिक अत्याचार करत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी ही टिप्पणी केली. आयएसच्या दहशतवाद्यांनी मिंडानाओच्या मरावा शहरावर कब्जा केला आहे.  
वायफळ बोलण्याबद्दल अध्यक्ष दुतेर्ते यांची ख्याती आहे. मात्र, ‘तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे करत राहा, बाकी सर्व मी पाहून घेईन. जर एखाद्या सैनिकाने नियम तोडला तर मी स्वत: त्याला तुरुंगात टाकीन,’ असे त्यांनी स्पष्ट केले. मग विनोद करताना ते म्हणाले की, ‘जर तुम्ही तीन महिलांवर अत्याचार केला तर मी ते मान्य करेन. ते माझ्यावर सोडून द्या.’ मार्शल लॉ लागू करण्याआधी ते सैनिकांशी चर्चा करत होते.  दुतेर्ते यांच्या या टिप्पणीने अगदी अमेरिकेपासून त्यांना विरोध सुरू झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...