आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीव : विरोधी आंदोलनाच्य़ा भितीने यामीन यांनी जाहीर केली आणीबाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माले - मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी बुधवारपासून आणीबाणी जाहीर करून टाकली. सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर स्फोटके सापडली. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा दावा करून आणीबाणीचा निर्णय घेण्यात आला.

मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष असून या पक्षाने सरकारच्या विरोधात निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. िनदर्शनाच्या दोन दिवस अगोदर राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेतला.

माजी राष्ट्राध्यक्ष मोहंमद नाशीद यांची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी ही निदर्शने पुकारण्यात आली आहेत. सोमवारी मुलियाज भागातील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ स्फोटक आढळून आले होते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आणीबाणी लावण्यात येत असल्याचे यामीन यांनी स्पष्ट केले.

तीस दिवसांचा असेल अाणीबाणीचा कालावधी
राष्ट्राध्यक्ष यामीन यांनी ३० दिवसांची आणीबाणी लागू केली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून तिची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याअगोदर २५ ऑक्टोबर रोजी उपराष्ट्राध्यक्ष अहमद अदीब यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्राध्यक्षांच्या बोटीतील स्फोटांत हात असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. २८ सप्टेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष हज यात्रेहून परतल्यानंतर त्यांची हत्या घडवण्याचा हा कट होता.