आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नेतान्याहूंनी राजीनामा द्यावा’ हजारो नागरिक रस्त्यावर; इस्रायलमध्ये पंतप्रधानविरोधी निदर्शने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल अविव- इस्रायलमध्ये सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचारावरून जनतेत संतप्त भावना असून रविवारी त्याचा उद्रेक पाहायला मिळाला. हजारोंच्या संख्येने लोक राजधानीत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांंनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. 


नेतान्याहू यांना त्यांच्या अतिश्रीमंत समर्थकांकडून महागड्या भेटी मिळाल्या आहेत. त्यांनी अशा भेटी स्वीकारून भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप जनतेमधून केला जात आहे. शनिवारपासून निदर्शक तेल अविवमध्ये दाखल झाले आहेत. त्यापूर्वी गेल्या काही महिन्यांपासून आठवड्याला अशा प्रकारची आंदोलने केली जात होती. नेतान्याहू व त्यांच्या सरकारने देशाला पोखरून टाकले आहे. भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. आता नेतान्याहू यांना सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार राहिलेला नाही, अशी मागणी निदर्शकांपैकी असलेल्या मायकल नावाच्या कार्यकर्त्याने केली.विरोधी पक्ष नेते इसाक हेर्जोग म्हणाले, जनतेमध्ये नैराश्य आले आहे. अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. 

 

नेतन्याहूंना अभय देणारा कायदा, आज नवीन मसुद्याचे वाचन
इस्रायल संसदेत नवीन कायद्याचे मसुद्याचे दुसरे व तिसरे वाचन केले जाणार आहे. हा कायदा नेतान्याहू यांना सर्व गुन्ह्यातून वाचवणारा आहे, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. नेतान्याहू यांनी मोठे उद्योगपती तसेच हॉलीवूडचे निर्माते अर्नोन मिल्कान यांच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नव्या कायद्यातील तरतुदी नेतन्याहूंचा बचाव करणाऱ्या ठरतील. नेतान्याहू यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एवढेच नव्हे तर हा आपल्या विरोधातील राजकीय कट असल्याचा दावाही केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...